अंनिसचं लेखापरीक्षण करा - सहाय्यक धर्मादाय आयुक्त

अंनिसचं लेखापरीक्षण करा - सहाय्यक धर्मादाय आयुक्त

अंधश्रद्धा निमृलन समितीविरोधात हिंदू जनजागरण समितीनं दाखल केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने सहाय्यक धर्मादाय आयुक्त सातारा यांनी न्यासाचे विशेष लेखापरीक्षण करण्याचा आदेश दिला आहे.

  • Share this:

20 आॅगस्ट : अंधश्रद्धा निमृलन समितीविरोधात हिंदू जनजागरण समितीनं दाखल केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने सहाय्यक धर्मादाय आयुक्त सातारा यांनी न्यासाचे विशेष लेखापरीक्षण करण्याचा आदेश दिला आहे.

न्यासात अनियमितता असून त्याची चौकशी करण्यात यावी असा अर्ज हिंदू जनजागरण समितीनं धर्मादाय आयुक्तांकडे केली होती. नरेंद्र दाभोलकर हे हयात असताना त्यांनी या चौकशीला आपण तयार आहोत असं म्हटले होतं तर आत्ताचे विश्वस्त चौकशीला तयार नाहीयत. त्या काळातच दाभोलकरांचा खून झाला आणि हा मुद्दा पुणे पोलीस आणि सीबीआयनं आपल्या चौकशी दरम्यान लक्षात घेतला नाही असा आरोप हिंदू विधिज्ञ परिषदेचे अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केला आहे.

काय आहे सहाय्यक धर्मादाय आयुक्तांचे निष्कर्ष  ?

१) न्यासानं स्वयंघोषित अंशदानातून सूट घेतलेली असल्याचं आणि अंशदानाची रक्कम भरली नसल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे

२) सावंतवाडी इथल्या २३ हजारांची स्थावर मिळकत खरेदी केली पण त्यानंतरच्या हिशोबपत्रांमध्ये सदरची मिळकत नमूद नाही

३) ग प्र प्रधान यांच्या न्यासाच्या अंनिसमध्ये झालेल्या विलिनीकरणाचा मुद्दा

४) विनामूल्य वितरणाकरता छापलेल्या पुस्तकांचं मूल्य का निश्चित करण्यात आलं हे स्पष्ट होत नाही

५) न्यासाच्या राज्यभर शाखा असताना सर्व शाखांची माहिती संकलित करुन एकत्रितपणे हिशोबपत्रे दाखल करणे अनिवार्य असताना ते तसं करण्यात आल्याचं आढळून आलं नाहीये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2017 08:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading