शाळांच्या फी वाढीला लगाम लावणार, विनोद तावडेंची ग्वाही

शाळांच्या फी वाढीला लगाम लावणार, विनोद तावडेंची ग्वाही

अवाजवी फी वाढीबाबत खाजगी शिक्षण संस्थांना सूचना करण्यासोबतच, शुल्क नियंत्रण कायद्यात सुधारणा करण्याची ग्वाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलीय.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे,मुंबई

15 मे : राज्यातील खासगी प्राथमिक शाळांच्या भरमसाठ फीवाढी विरोधात पालक चांगलेच संतापले आहेत. पुण्यातल्या काही शाळांतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज (सोमवारी) शिक्षणमंत्री विनोद तावडेंची भेट घेतली. यावेळी अवाजवी फी वाढीबाबत खाजगी शिक्षण संस्थांना सूचना करण्यासोबतच, शुल्क नियंत्रण कायद्यात सुधारणा करण्याची ग्वाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलीय.

राज्यातील अनेक खासगी प्राथमिक शाळांनी मोठ्या प्रमाणात फी वाढ केली आहे. त्याचबरोबर इमारत बांधणी शुल्क, युनीफॉर्म, वह्या आणि पुस्तकं हे शाळेतूनच घेणं बंधनकारक केलं आहे. यामागे शिक्षणसंस्था चालकांनी मोठ्या प्रमाणावर पैसे वसुली सुरू केल्याचा आरोप पालकांनी केलाय.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तक्रार असलेल्या शाळांच्या व्यवस्थापक आणि पालक यांच्यात बैठक घेतली. दोन दिवसात कडक कारवाईच्या आश्वासनापलीकडे पालकांच्या हाती ठोस असं काही लागलं नाही.  ज्या संस्था नफेकोरी करतायत त्यांना वठणीवर आणू, कोणत्याही शाळांनी पुस्तके आमच्या शाळेतून घ्या याची सक्ती करता येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पुणे, औरंगाबाद आणि मुंबई या ठिकाणच्या शाळांबाबत तक्रारी असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी मान्य केलंय. पण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये शाळांच्या फीवाढीमुळे पालक त्रस्त आहेत. याकडे शिक्षणमंत्री लक्ष देणार का की, केवळ चर्चेचं गुऱ्हाळ करून विषय जैसे थेच ठेवणार हाही मुद्दा आहेच की..

First published: May 15, 2017, 9:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading