ऑनलाइन 'रम्मी'मध्ये बसला आर्थिक फटका, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

ऑनलाइन 'रम्मी'मध्ये बसला आर्थिक फटका, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

ऑनलाइन रम्मीमध्ये झालेले आर्थिक नुकसान सहन न झाल्याने उस्मानाबाद तालुक्यातील इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. श्रीकृष्ण हरी भोसले (वय-25, रा.हिंगळजवाडी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

  • Share this:

बालाजी निरफळ, (प्रतिनिधी)

उस्मानाबाद, 8 ऑगस्ट- ऑनलाइन रम्मीमध्ये झालेले आर्थिक नुकसान सहन न झाल्याने उस्मानाबाद तालुक्यातील इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. श्रीकृष्ण हरी भोसले (वय-25, रा.हिंगळजवाडी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, हिंगळजवाडी येथे गुरुवारी (8 ऑगस्ट) ही घटना घडली. श्रीकृष्ण इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. श्रीकृष्णला ऑनलाइन रम्मी खेळण्याचे व्यसन जडले होते. तो कायम मोबाइलवर 'जंगली' नावाचा रम्मी जुगार खेळत असे. त्यामध्ये तो पैसे हरला होता. आर्थिक नुकसान झाल्याने तो हताश झाला होता. यातून आलेल्या नैराश्यातून श्रीकृष्ण याने पहाटे राहत्या घरात छताला असलेल्या लोखंडी अॅंगलला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. एएसआय डी.एम चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.या प्रकरणी श्रीकृष्ण याचा चुलत भाऊ धनाजी भोसले याने दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस स्टेशनमध्ये अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास चव्हाण करीत आहेत.

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिले हे कारण...

दरम्यान, गेल्या महिन्यात चिखली (जि. बुलडाणा) अशीच एक घटना घडली होती. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांने गळफाल घेऊन आत्महत्या केली होती. अभियांत्रिकीच्या परीक्षेमध्ये अपयश आल्याने जीवन संपवत असल्याचे त्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. वैभव डहाळके (वय- 21) असे मृत विद्यार्थ्याचे नाव होते. अभियांत्रिकीच्या परीक्षेमध्ये अपयश आल्याने चिखली येथील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आयटीच्या प्रथम वर्षाला शिकणाऱ्या वैभवने आपल्या खोलीच्या छताला असलेल्या हुकला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी वैभवने सुसाईड नोट ही लिहून ठेवली आहे. त्यातही त्याने परीक्षेत अपयश आल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते.

वैभव हा मूळचा लोणार तालुक्यातील विरुपांगरा येथील रहिवासी होता. आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. तर चिखली येथे राउतवाडी भागात मित्रांसोबत खोली करून अभियांत्रिकीमध्ये शिकत होता. नुकताच त्याचा प्रथम वर्षाचा निकाल लागला. त्यात तो नापास झाल्याने त्याला नैराश्य आले होते.

पतीसमोरच पत्नीला लाठ्या-काठ्याने मारहाण, VIDEO व्हायरल

Published by: Sandip Parolekar
First published: August 8, 2019, 7:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading