Home /News /maharashtra /

भरधाव फोर्ड Endeavour कार नाल्यात कोसळली, 12 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

भरधाव फोर्ड Endeavour कार नाल्यात कोसळली, 12 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

नागपूर येथील गोयल कुटुंबीय व्याघ्र सफारीसाठी चंद्रपूरला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे येते होते.

    हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर, 01 डिसेंबर :  ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात (tadoba national park) सफारीसाठी येत असलेल्या पर्यटकांच्या वाहनाला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आणखी एका महिलेचा उपचारादरम्यान  मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 2 वर पोहोचली आहे. आज दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. नागपूर येथील गोयल कुटुंबीय व्याघ्र सफारीसाठी चंद्रपूरला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे येते होते.  चिमूर तालुक्यातील कोलारा प्रवेशद्वाराकडे जात असताना फोर्ड Endeavour गाडीवरील नियंत्रण अचानक सुटले आणि कार मासळ गावाजवळ भडगा नाल्यात कोसळली. Vodafone-Idea ग्राहकांना फटका; दोन पॉप्युलर रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ हा अपघात इतका भीषण होता की, नाल्यात पाणी कमी असल्यामुळे भरधाव  Endeavour कार खडकावर जोरात आदळली यात कारचा चुराडा झाला. नाल्याजवळ जोरात आवाज झाल्यामुळे  गावकऱ्यांनी तातडीने धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. गावकऱ्यांनी काही जणांना यातून बाहेर काढले. मात्र, कारमधील 12 वर्षीय सना अग्रवालचा मृत्यू झाला. तर 5 जण जखमी झाली आहे. उपचारादरम्यान 40 वर्षीय मिनू अग्रवाल यांचा मृत्यू झाला. विराट कोहलीला कर्णधारपदावरून काढता येणार नाही कारण.... जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासकार्य सुरू केले आहे. 12 वर्षांच्या चिमुरडीचा अपघातस्थळावर मृत्यू झाल्यामुळे गोयल कुटुंबांचा आक्रोश मन हेलावून टाकणार होता. नेमका हा अपघात कशामुळे घडला याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या