ठाण्यात खवले मांजर विकणाऱ्या दोघांना अटक, 40 लाखात विकण्याचा होता डाव

ठाण्यात खवले मांजर विकणाऱ्या दोघांना अटक, 40 लाखात विकण्याचा होता डाव

या मांजराला चाळीस लाख रुपयात विकण्यासाठी आणले होते. पण विक्री होण्याआधीच क्राईम ब्रांच यूनिट 5ने त्यांना ताब्यात घेतले.

  • Share this:

23 फेब्रुवारी : अतिशय दुर्मिळ असलेलं खवले मांजर विकण्यासाठी आलेल्या दोन जणांना ठाणे क्राईम ब्रांचकडून अटक करण्यात आलीये.

खवले मांजर बद्दल क्वचित लोकांनाच माहिती असेल. तोंडात एकही दात नसलेला आणि मुंग्या आणि त्यांच्या अळया खाऊन जगणारा हा सस्तन प्राणी दुर्मिळ होत चालला आहे. रायगड येथील दोन इसम हे खवले मांजर विकण्यासाठी ठाण्यात घेऊन आले होते.

या मांजराला चाळीस लाख रुपयात विकण्यासाठी आणले होते. पण विक्री होण्याआधीच क्राईम ब्रांच यूनिट 5ने त्यांना ताब्यात घेतले. कॅन्सर सारख्या आजारावर औषध बनवण्यासाठी खवल्यांचा वापर केला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2018 06:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading