आजपासून लाल दिवे कायमचे हद्दपार

आजपासून लाल दिवे कायमचे हद्दपार

  • Share this:

1 मे : केंद्र सरकारने व्हीआपी कल्चर बंद करण्यासाठी नेत्यांना गाडीवरील लाल दिवा कायमचा हटवण्याचा निर्णय घेतला. त्याची अमंलबजावणी आजपासून केली जाणार आहे. त्यामुळे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाडीवरील लाल दिवा आजपासून इतिहासजमा होणार आहेत.

मोदी सरकाराने हा निर्णय घेताच काही मंत्र्यांनी आपल्या गाडीवरील लाल दिवा यापूर्वीच काढून ठेवला होता. पण आता कोणत्याही मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या गाडीला लाल दिवा नसणार आहे. फक्त यापुढे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि लोकसभा अध्यक्ष यांनाच लाल दिव्याची गाडी वापरता येणार आहे. तर अत्यावश्यक सेवांसाठी निळा दिवा वापला जाईल. पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या अशा अत्यावश्यक सेवांसाठीच फक्त निळा दिवा वापरण्यात येणार आहे

21 एप्रिल रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाल दिवे हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आजपासून गाड्यावरील लाल दिवा कायमचा हद्दपार करण्यात आला आहे.

First published: May 1, 2017, 12:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading