मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Daya Nayak : दया नायक यांची पुन्हा मुंबईत एन्ट्री, राज्यातील पोलिसांच्या बदल्या

Daya Nayak : दया नायक यांची पुन्हा मुंबईत एन्ट्री, राज्यातील पोलिसांच्या बदल्या

चकमक फेम पोलिस निरीक्षक दया नायक यांची मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. सध्या दया नायक हे दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत आहेत.

चकमक फेम पोलिस निरीक्षक दया नायक यांची मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. सध्या दया नायक हे दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत आहेत.

चकमक फेम पोलिस निरीक्षक दया नायक यांची मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. सध्या दया नायक हे दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 मार्च : राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या सोमवारी करण्यात आल्या. यामध्ये चकमक फेम पोलिस निरीक्षक दया नायक यांची मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. सध्या दया नायक हे दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत आहेत. आता बदलीनंतर त्यांची पुन्हा एकदा मुंबई पोलिसात एन्ट्री होणार आहे. दया नायक यांची २०२१ मध्ये एटीएसमधून गोंदियात बदली केली होती.

एंटालिया-मनसुख हिरेन प्रकरणामुळे त्यांची बदली केले गेली होती. तेव्हा प्रशासकीय बदली असल्याचं कारण सांगण्यात आलं होतं. तर दया नायक यांनी त्यावेळी बदलीच्या आदेशाला मॅटमध्ये आव्हान दिलं होतं. त्यानंतर नायक यांच्या बदलीच्या आदेशाला मॅटने स्थिगिती दिली होती. तेव्हापासून दया नायक हे एटीएसमध्ये कार्यरत आहेत.

आधी ठाकरे, आता राऊत.. सावरकरांवरुन राहुलवर हल्लाबोल; उद्धव सेना घेणार मोठा निर्णय?

एन्काउंटर स्पेशालिस्ट अशीही दया नायक यांची ओळख आहे. १९९५ मध्ये दया नायक हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्त झाले होते. त्यांनी गुन्हे अन्वेषण शाखेत प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केलं. प्रदीप शर्मा यांच्या एन्काउंटर पथकात ते होते. १९९६ मध्ये दया नायक यांनी पहिला एन्काउंटर केला. त्यांनी जवळपास ८० एन्काउंटर केले आहेत.

बेहिशेबी मालमत्ता आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोपही दया नायक यांच्यावर झाले होते. यामुळे त्यांना २००६ मध्ये निलंबित करण्यात आलं होतं. एसीबीने त्यांना अटक केली होती. मात्र पुरावे सादर न केल्यानं दया नायक यांना क्लीन चीट मिळाली. २०१२ मध्ये ते पुन्हा सेवेत रुजू झाले. तेव्हाही मुंबईहून नागपूरला बदली झाल्यानंतर ते रुजू झाले नव्हते. त्यावेळी दया नायक यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. २०१६ मध्ये त्यांच्यावरील कारवाई मागे घेत पुन्हा मुंबईत पोस्टिंग देण्यात आलं होतं.

First published:
top videos

    Tags: Mumbai