मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बारामतीमध्ये शेतात उतरले भारतीय वायू दलाच्या हेलिकॉप्टर, VIDEO

बारामतीमध्ये शेतात उतरले भारतीय वायू दलाच्या हेलिकॉप्टर, VIDEO

 अचानक शेतात हेलिकॉप्टर उतरल्यामुळे गावामध्ये एकच खळबळ उडाली. बघ्यांची एकच गर्दी उसळली

अचानक शेतात हेलिकॉप्टर उतरल्यामुळे गावामध्ये एकच खळबळ उडाली. बघ्यांची एकच गर्दी उसळली

अचानक शेतात हेलिकॉप्टर उतरल्यामुळे गावामध्ये एकच खळबळ उडाली. बघ्यांची एकच गर्दी उसळली

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Baramati, India

बारामती, 01 डिसेंबर : बारामतीमध्ये भारतीय वायू दलाच्या हेलिकॉप्टरने इमर्जन्सी लँडिंग झाले आहे. हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे एका शेतात हे हेलिकॉप्टर उतरले आहे. सुदैवीने या दुर्घटनेमध्ये कुणालाही दुखापत झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीमधील खांडज गावातील एका शेतात अचानक हेलिकॉप्टरचे लँडिंग करण्यात आले आहे. भारतीय वायू दलाचे हे हेलिकॉप्टर आहे.

तांत्रिक बिघाड झाल्यामुळे चालकाने हेलिकॉप्टर शेतात उतरवले. अचानक शेतात हेलिकॉप्टर उतरल्यामुळे गावामध्ये एकच खळबळ उडाली. बघ्यांची एकच गर्दी उसळली होती. घटनेची माहिती मिळताच मदतकार्य करण्यासाठी दुसरे हेलिकॉप्टर घटनास्थळी दाखल झाले आहे.

नियंत्रण सुटलं अन् घात झाला; एसटी बसचा भीषण अपघात

दरम्यान, धुळे-चाळीसगाव मार्गावर एसटी बस पलटल्यानं अपघात झाला आहे. चाळीसगाव -अक्कलकुवा बस धुळे-चाळीसगाव मार्गावर पलटी झाली. या अपघातामध्ये एकूण 15 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. यातील चार प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस पलटी झाल्याचा अंदाज आहे.

(मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू तर एक गंभीर)

चाळीसगाव -अक्कलकुवा बस धुळे-चाळीसगाव मार्गावर पटली झाली आहे. चालकावरील बसचा ताबा सुटल्यानं बस पलटी झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात बसमधील 15 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. यातील चार प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.

First published: