अकरावीची ऑनलाइन नोंदणी आजपासून, प्रवेशासाठी असा करा अर्ज

अकरावीची ऑनलाइन नोंदणी आजपासून, प्रवेशासाठी असा करा अर्ज

1 ते 15 जुलैमध्ये ऑनलाइन नोंदणी करावी. त्यानंतर 15 जुलैपासून निकाल जाहीर होईपर्यंत प्रवेश अर्जाचा पहिला भाग पूर्ण करावा.

  • Share this:

मुंबई, 02 जुलै : दहावी-बारावीचे निकाल जुलै अखेरपर्यंत लागण्याची शक्यता असतानाच आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. शिक्षण विभागानं इयत्ता 11 वी महाविद्यालयीन प्रवेशाची प्रक्रिया सुरु केली आजपासून त्याची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जाचा पहिला भाग 15 जुलैनंतर भरता येणार आहे.

दहावीचे निकाल जुलै अखेरीस जाहीर होतील असं सांगण्यात आलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर नोंदणी सुरू करण्यात आली असून निकालानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालय निवडीची प्रक्रिया करता येणार आहे. निकालानंतर पुढील दीड महिन्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा सूचनाही शिक्षण विभागाकडून महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.

हे वाचा-पुण्यात कोरोनाची परिस्थिती आणखी चिंताजनक, 24 तासातील रेकॉर्डब्रेक आकडेवारी समोर

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीचे उर्वरित पेपर रद्द करण्यात आले होते. त्यानंतर जुलै अखेरपर्यंत दोन्ही वर्षांचे निकाल येतील असं सांगण्यात आलं होतं. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन रेड झोनमधील महाविद्यालयं 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत इयत्ता 11 वीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असा अंदाज आहे.

1 ते 15 जुलैमध्ये ऑनलाइन नोंदणी करावी. त्यानंतर 15 जुलैपासून निकाल जाहीर होईपर्यंत प्रवेश अर्जाचा पहिला भाग पूर्ण करावा. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे. तुम्हाला ज्या क्षेत्रातील महाविद्यालय हवं आहे ते निवडा आणि त्यानंतर सर्वप्रथम युनिवर्सिटीच्या वेबसाइटला जाऊन लॉग इन प्रक्रिया पूर्ण करा. तुमचा लॉगइन आणि पासवर्ड हा कायम लक्षात ठेवा. लॉगइन नंतर तिथल्या सिक्युरिटी प्रश्नांची उत्तर द्या आणि त्यानंतर आलेला फॉर्म भरा आणि त्याची प्रिंट काढा. वेबसाइटवर दिलेल्या सूचनांनुसार अर्ज भरावा.

संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

First published: July 2, 2020, 8:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading