आई-वडील झोपले होते घरात.. 11 महिन्यांच्या चिमुरड्याचा बादलीत पडून मृत्यू

आई-वडील झोपले होते घरात.. 11 महिन्यांच्या चिमुरड्याचा बादलीत पडून मृत्यू

अवघ्या 11 महिन्यांच्या चिमुरड्याचा बादलीत पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नाशकात घडली आहे. तन्मय दीपक भोये असे मृत बालकाचे नाव आहे. तन्मय खेळता खेळता बादलीत पडला.

  • Share this:

प्रशांत बाग, (प्रतिनिधी)

नाशिक, 12 ऑगस्ट- अवघ्या 11 महिन्यांच्या चिमुरड्याचा बादलीत पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नाशकात घडली आहे. तन्मय दीपक भोये असे मृत बालकाचे नाव आहे. तन्मय खेळता खेळता बादलीत पडला. नाका तोंडात पाणी गेल्याने त्याचा गुदमरून झाला. पंचवटी भागातील दळवी चाळमध्ये रविवारी (11 ऑगस्ट) दुपारी ही दुखद घटना घडली आहे. घटना घडली तेव्हा तन्मयचे आई-वडील घरात झोपले होते.

मिळालेली माहिती अशी की, भोये कुटुंबातील सर्व सदस्य रविवारी दुपारी बारा वाजेच्या घरात झोपले होते. त्यावेळी तन्मय खेळता-खेळता बाथरुमजवळ गेला. पाण्याने भरलेल्या बादलीजवळ तन्मय डोकावून पाहत असतानी त्याचा तोल गेला आणि तो बादलीत खाली डोकं आणि वर पाय अशा अवस्थेत पडला. त्याच्या नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे त्याला श्वासोच्छ्वास करता आला नाही. त्यातच त्याची गुदमरून मृत्यू झाला. तन्मय पाण्यात पडल्याचे समजताच भोये कुटुंबीयांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण मोरे मळा भागात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक क्रिशनेनंदू चौधरी यांची निर्घृण हत्या

दुसऱ्या एका घटनेत मुंबईतील प्रसिद्ध दिग्दर्शक क्रिशनेनंदू चौधरी यांची निर्घृण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्याची हत्या करून मृतदेह बेडशीटमध्ये बांधून फेकण्यात आला. हा मृतदेह विरारच्या खणीवडे खाडीत सापडला. विरार पूर्व खाणीवडे रेतीबंदरावर शुक्रवारी (9 ऑगस्ट) अज्ञात व्यक्तींनी चौधरी यांची हत्या करून मृतदेह फेकला. याबाबत अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. शनिवारी (10 ऑगस्ट) रात्री या मृतदेहाची ओळख पटली. हा मृतदेह मुंबईतील प्रसिद्ध ‘आर्ट डायरेक्टर’ क्रिशनेनंदू चौधरी यांचा असल्याचे समोर आले. या प्रकरणाचा तपास करण्साठी 3 स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत.

SPECIAL REPORT: मधू इथे तर चंद्र तिथे; पुरामुळे नवरा-नवरी अडकले, लग्नाचा मुहूर्त टळला!

Published by: Sandip Parolekar
First published: August 12, 2019, 2:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading