पर्यटकांचं आकर्षण असलेला 'एलिफंटा महोत्सव' शनिवारी सुरू होणार

पर्यटकांचं आकर्षण असलेला 'एलिफंटा महोत्सव' शनिवारी सुरू होणार

सूर, संगीत, शिल्प आणि चित्रकलेचा आविष्कार असलेला "एलिफंटा महोत्सव" 1 आणि 2 जून (शनिवार आणि रविवार) सुरू होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 29 मे : सूर, संगीत, शिल्प आणि चित्रकलेचा आविष्कार असलेला "एलिफंटा महोत्सव" यंदा 1 आणि 2 जून (शनिवार आणि रविवार) रोजी एलिफँटा अर्थात घारापूरीच्या बेटांवर होतो आहे. "स्वरंग" ही या सोहळ्याची संकल्पना आहे. दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात गीत, संगीत, गायन, पर्यटन, चित्रकला आदींची रेलचेल असणार आहे...

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि.1 जून) सायंकाळी 6 वाजता या महोत्सवाचे उदघाटन गेट वे ऑफ इंडिया येथे करण्यात येणार आहे. प्रख्यात गायक कैलास खेर यांचा शिवआराधना या विषयावरील होणारा सुराविष्कार कार्यक्रम या उदघाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण आहे..

रविवारी ( 2जून) रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत घारापुरीच्या बेटावर असलेली शिव शिल्प लेण्यांचे दर्शन घडवणाऱ्या हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दिव्यांग संस्था, अनाथाश्रमातील सदस्यांना लेण्यांची सफर घडवली जाणार आहे. शिवतांडव, योगमुद्रा, शिवप्रतिमा, गंगावतरण, अर्धनारीनटेश्वर, त्रिमूर्ती आदी प्राचीन शिल्प लेण्यांचे दर्शन वंचितांना घडावी या पर्यटन मंत्री रावल यांच्या संकल्पनेनुसार या हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी संध्याकाळी 7 वाजता घारापुरीच्या बेटावर गीत, संगीत चित्रकलेचा अनोखा मिलाफ पाहायला मिळणार आहे. प्रख्यात गायक राहुल देशपांडे, स्वप्नील बांदोडकर, प्रियांका बर्वे यांच्या गीतांचा कार्यक्रम होईल. यावेळी सुलेखनकार अच्युत पालव, चित्रकार वासुदेव कामत, व्यंगचित्रकार निलेश जाधव, शील कुंभार आदी शिवतांडवशी नाते सांगणारा चित्र आविष्कार लाईव्ह सादर करतील.

या दोन दिवसीय एलिफंटा महोत्सवाचा लाभ देश विदेशातील हजारो पर्यटक घेतात. यंदाही या महोत्सवामुळे रोजगाराच्या शेकडो नव्या संधी व्यावसायिकांना उपलब्ध होणार आहेत. पर्यटकांनी मोठ्या संख्येने या महोत्सवाला हजेरी लावावी असे आवाहन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे.

महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी पर्यटन विभागाच्या सचिव विनिता वेद सिंगल, पर्यटन संचालक दिलीप गावडे, व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे आदींसह अधिकारी परिश्रम घेत आहेत.

First published: May 29, 2019, 11:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading