चंद्रपुरात 'गजराज' पिसाळला! वनविभागाच्या अधिकाऱ्याला संतप्त हत्तीने चिरडलं

चंद्रपुरात 'गजराज' पिसाळला! वनविभागाच्या अधिकाऱ्याला संतप्त हत्तीने चिरडलं

चंद्रपुरात पिसाळलेल्या हत्तीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला आहे.

  • Share this:

चंद्रपूर, 06 मे : अवाढव्य हत्ती (Elephant) पिसाळला तर काय होऊ शकते, याची कल्पना करूनच घाम फुटतो. असाच एक हत्ती चंद्रपुरात पिसाळला (Chandrapur Elephant attack)  आहे. पिसाळलेल्या हत्तीन वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला आहे. त्यात एकाच जागीच मृत्यू झाला आहे (Elephant killed forest officer). ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ही घट धक्कादायक घटना घडली आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 'गजराज' (Gajraj) नावाचा हा हत्ती. तो पिसाळला होता, सैरावैरा पळत सुटला होता. त्याने थेट वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला हल्ला. दोन अधिकाऱ्यांवर तो धावून गेला. प्रमोद गौरकार आणि कुलकर्णी अशी या दोन्ही अधिकाऱ्यांची नावं आहे. प्रमोद हे मुख्य लेखापाल आहेत तर कुलकर्णी हे सहाय्यक वनसंरक्षक. दोघंही गस्तीवर होते. तेव्हा बिथरलेला गजराज त्यांच्याकडे धावत आला आणि त्याने दोघांवरही हल्ला केला. हत्तीने चिरडल्याने प्रमोद गौरकार यांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचा - पाठलाग करणं चांगलंच पडलं भारी; गेंड्याने भयंकर रागात असं काही केलं...पाहा VIDEO

ताडोबा कोअर क्षेत्रातील बोटेझरी इथल्या हत्ती कॅम्पलगतची ही घटना आहे.  या घटनेने संपूर्ण वनविभाग हादरला आला. आसपासच्या गावातील नागरिकांना बिथरलेल्या हत्तीबाबत सूचना देण्यात आली. हत्तीला नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. दरम्यान ही पहिलीच घटना नाही. तर याआधीही गजराजने आपल्याच माहुताला चिरडलं होतं.

Published by: Priya Lad
First published: May 6, 2021, 10:50 PM IST

ताज्या बातम्या