मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्यात लवकरच वीज दरवाढीचा शॉक; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

राज्यात लवकरच वीज दरवाढीचा शॉक; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

महावितरणनं वीज दर वाढवण्यासंदर्भात एमईआरसीकडं प्रस्ताव दाखल केला आहे. यात वीज वाढ करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

15 जानेवारी : राज्यातल्या जनतेला आता लवकरच वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे. कारण महावितरणनं वीज दर वाढवण्यासंदर्भात एमईआरसीकडं प्रस्ताव दाखल केला आहे. यात वीज वाढ करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला आहे. आधीच जीएसटीच्या काचाने सर्वसामान्यांचं खिसे मोकळे झाले आहेत. त्यात आता वीज वाढ झाली तर मात्र मध्यमवर्गीयांना याचा मोठ फटका बसण्याची शक्यता आहे.

मात्र कोल इंडियानं 15 टक्के कोळशाच्या दरात वाढ केली आहे. या दरवाढीमुळे थोडथोडक्या प्रमाणात येणाऱ्या विजबीलात आता इंधन दरा वाढ झाल्यामुळे थोडं जास्त बिल येण्याची शक्यता आहे. या इंधन वाढीमुळे वीज दरवाढीसाठीचा प्रस्ताव तयार करावा लागत असल्याचं राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. पण वीजेच्या दरात थोड्या प्रमाणात वाढ होईल, वीज फार महाग होणार नाही. असं उर्जामंत्र्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.

तसं पहायला गेलं तर तेलाचे भाव सध्या कमी झाले आहेत. त्यामुळे या सगळ्यांचा ताळमेळ साधत एमईआरसी महावितरणातच्या निर्णयावर काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

First published:

Tags: Increase, Maharshtra, Power rate, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र, महावितरण, वीज दरवाढ