मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वीज मिटरमध्ये बसवायचे इलेक्ट्रिक रिमोट, कारनामा ऐकून पोलिसांनीही बसला 'शॉक'

वीज मिटरमध्ये बसवायचे इलेक्ट्रिक रिमोट, कारनामा ऐकून पोलिसांनीही बसला 'शॉक'

 दोन्ही आरोपी लोकांना वीज चोरी करण्याकरीता प्रोत्साहित करुन एका मिटरच्या मागे त्यांच्याकडून 10,000 रुपये घेत होते

दोन्ही आरोपी लोकांना वीज चोरी करण्याकरीता प्रोत्साहित करुन एका मिटरच्या मागे त्यांच्याकडून 10,000 रुपये घेत होते

दोन्ही आरोपी लोकांना वीज चोरी करण्याकरीता प्रोत्साहित करुन एका मिटरच्या मागे त्यांच्याकडून 10,000 रुपये घेत होते

मुंबई, 20 जानेवारी :  विद्युत मिटरमध्ये फेरफार करुन वीज चोरी करण्यासाठी पैसे घेणाऱ्या दोन आरोपीना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. हे आरोपी लोकांकडून दहा हजार रुपये घेत होते. गुन्हे शाखेच्या अटकेत असलेले दोन्ही आरोपी लोकांना वीज चोरी करण्याकरीता प्रोत्साहित करुन एका मिटरच्या मागे त्यांच्याकडून 10,000 रुपये घेत होते. अशीच माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या अनुशंगाने सापळा रचून एका बोगस ग्राहकाला तयार करुन दोघांना  मुलुंड परिसरातून अटक करण्यात पोलिसांना 17 जानेवारी रोजी यश मिळालं. खरंतर हे दोन्ही आरोपी इलेक्ट्रिक मिटरमध्ये फेरफार करत होते. ते मिटरची सील उघडून त्याच्या सर्किटमध्ये रिमोट कंट्रोल सर्किट बसवत होते आणि नंतर पुन्हा मिटर जशाच्या तसं करून देत होते. त्यामुळे याबद्दल लोकांना किंवा विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना होत नव्हती आणि विद्युत चोरी होऊन महावितरणला चुना लावला जात होता. अटक आरोपी हे सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत. त्यांना 23 जानेवारी 2020 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. मात्र, पुढील तपास सुरू आहे. तसंच या दोघांनी आणखी कुठे कुठे आणि किती विद्युत मिटरमध्ये रिमोट कंट्रोल सर्किट बसवलं आहे आणि त्यांच्या या रॅकेटमध्ये इतर कोण कोण आहे ? याचा तपास पोलीस करत आहे. मोबाईल चोरांना अटक दरम्यान,  मुंबईत रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातातील मोबाइल हिसकावून पळ काढणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली आहे. गेले काही दिवस मुंबईतल्या अंधेरी आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे चोरटे सक्रीय झाले होते. मोबाइल चोरीच्या अशा प्रकारच्या अनेक तक्रारी लोकांकडून देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका पथकासह सापळा रचला. यादरम्यान गुन्हे शाखा दहाच्या अधिकाऱ्यांनी पाळत ठेवली असता दोन संशयित व्यक्ती आढळून आले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून चोरीचे 4 मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. तसंच मोटरसायकल सुद्धा जप्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या विरोधात अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
First published:

Tags: Local, Mumbai, Mumbai crime

पुढील बातम्या