पंचायत समितीसाठी मतदान संपलं; सर्वत्र शांततेत मतदान

पंचायत समितीसाठी मतदान संपलं; सर्वत्र शांततेत मतदान

गडचिरोली जिल्ह्यात माओवाद प्रभावीत भागातही मतदान संपलं. मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. बुलेटवर बॅलेट भारी पडलं आहे. तब्बल 75 टक्के मतदान सर्वाधीक 81 टक्के मतदान संवेदनशील मतदान केंद्र असलेल्या सिरोंचा तालुक्यात झाले. वडदम ग्रामपंचायतीत तर सर्वाधिक 90 टक्के मतदान करण्यात आलं

  • Share this:

16 ऑगस्ट: ग्राम पंचायत समितीसाठी दुसऱ्या चरणातही शांततेत मतदान पार पडलं आहे. कुठल्याही प्रकारचा दगाफटका झाला नाही.

यावेळी नक्षलवाद्यांनी प्रभावित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही निवडणुका होत्या. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद प्रभावीत भागातही मतदान संपलं. मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. बुलेटवर बॅलेट भारी पडलं आहे. तब्बल 75 टक्के मतदान सर्वाधीक 81 टक्के मतदान संवेदनशील मतदान केंद्र असलेल्या सिरोंचा तालुक्यात झाले. वडदम ग्रामपंचायतीत तर सर्वाधिक 90 टक्के मतदान करण्यात आलं. कडक सुरक्षा व्यवस्थेत कुठलाही अनुचित प्रकार न होता शांततेत मतदान पार पडल दुपारी तीन वाजता इथलं मतदान संपलं.

गेली काही दिवस राज्याच्या ग्रामीण भागात सुरु असलेला ग्रामपंचायतींचा धुराळा आज थंडावला. राज्यातील दुसऱ्या टप्प्यातल्या ग्रामपंचायतींसाठीचं मतदान आज पार पडलं. एकूण 3739 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालंय. जाहीर कार्यक्रमानुसार 4 हजार 119 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार होती. पण 380 ग्रामपंतायतींमध्ये बिनविरोध निवडणुका झाल्यात. थेट जनतेतून सरपंच निवडण्याची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्या टप्प्यात या निर्णयाचा भाजपला चांगला फायदा झाल्याचं दिसलं.

या टप्प्यात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2017 07:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading