• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • राज्यात केव्हाही निवडणुका लागू शकता, भाजप आमदाराचा मोठा दावा

राज्यात केव्हाही निवडणुका लागू शकता, भाजप आमदाराचा मोठा दावा

'राज्यातील सरकार हे घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज सरकार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील 3 पक्षामध्ये विसंवादाची लढाई लागली आहे'

'राज्यातील सरकार हे घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज सरकार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील 3 पक्षामध्ये विसंवादाची लढाई लागली आहे'

'राज्यातील सरकार हे घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज सरकार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील 3 पक्षामध्ये विसंवादाची लढाई लागली आहे'

 • Share this:
  गणेश दुडम, प्रतिनिधी पुणे, 01 सप्टेंबर : ' महाविकास आघाडी सरकारमधील (mva government) 3 पक्षामध्ये विसंवादाची लढाई लागली आहे. 2 पक्षाचे संकेत जे आमच्याकडे येत आहेत. त्यावरून राज्यात निवडणूक (election) केव्हाही लागू शकते असे सूतोवाच भाजपचे (bjp) आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी केलं आहे. महाविकास आघाडी सरकार कधी पडणार याबद्दल भाजपच्या नेत्यांनी वारंवार मुहूर्त देत अनेक दावे केले आहे. पण, आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आता थेट मध्यावर्ती निवडणुकीचे संकेत दिले आहे.  मावळमध्ये भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात आशिष शेलार बोलत होते. 'फोनवर कोणाशी बोलत होती'', पतीनं विचारताच महिलेनं संपवलं आयुष्य राज्यातील सरकार हे घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज सरकार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील 3 पक्षामध्ये विसंवादाची लढाई लागली आहे. 2 पक्षाचे संकेत जे आमच्याकडे येत आहेत. त्यावरून राज्यात निवडणूक केंव्हाही लागू शकते, असा दावाच आशिष शेलार यांनी केला आहे. 'राज्यात असलेला सरकार हे घोटाळेबाज, झोलबाज आणि दगेबाज असलेलं सरकार आहे. राष्ट्रवादी हा घोटाळेबाज, काँग्रेस हा झोलबाज आणि शिवसेना हा दगाबाज असे हे तीन पक्षांचं सरकार आहे. शिवसेनेने मोदींचा फोटो वापरून निवणुकीत यश मिळवलं तर निवडणूक झाल्यानंतर दगेबाजी केली. त्यामुळे शिवसेना हा पक्ष दगेबाजच असणार आहे, अशी टीकाही आशिष शेलारांनी केली.

  काय देशी? काय विदेशी? खाद्यपदार्थांबद्दलचा हा गोंधळ करा दूर; वाचा सविस्तर

  मुख्यमंत्र्यांची कुलदैवत असलेल्या एकविरा गडाचा देखील विकास झालेला नाही.  दगाबाजी करून सरकारमध्ये बसले तरी विकासासाठी मात्र काहीच नाही.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुलदैवत असलेल्या मावळमधील कार्ला एकविराचा पण साधा विकास देखील नाही. दोन वर्ष सत्ता उपभोगत असताना देखील कार्लाकडे दुर्लक्ष केले. तर राज्याचं काय असेल? स्वतःच्या कुलदैवतासाठी आणि आमच्या एकविरा तरी मुख्यमंत्र्यांनी कार्ला एकविरा गडाचा तरी विकास करावा, अशी टीका आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
  Published by:sachin Salve
  First published: