मुक्ताईनगरात नाथाभाऊंना धक्का.. ही आहेत रोहिणी खडसेंचा पराभवाची कारणे

विधानसभा निवडणुकीत भाजपचे निष्ठावंत नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे (नाथाभाऊ) यांनी धक्का बसला

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 03:33 PM IST

मुक्ताईनगरात नाथाभाऊंना धक्का.. ही आहेत रोहिणी खडसेंचा पराभवाची कारणे

भुसावळ,24 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीत भाजपचे निष्ठावंत नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे (नाथाभाऊ) यांनी धक्का बसला आहे. नाथाभाऊंची कन्या रोहिणी खेवलकर-खडसे यांचा पराभव झाला आहे.मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी 1927 मतांनी रोहिणी खेवलकर-खडसे यांचा पराभव केला आहे. दरम्यान,एकनाथ खडसेंचे तिकीट कापल्याने चर्चेत राहिलेली मुक्ताईनगरची जागा भाजपला राखता येईल की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

राष्ट्रवादीने ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेऊन शिवसेना बंडखोर चंद्रकांत पाटील यांनी पुरस्कृत करण्याची खेळी केली होती. या मतदारसंघात आजवर मराठा उमेदवारांमधील मतविभागणी खडसेंच्या पथ्यावर पडत होती. यंदा ती शक्यता मावळल्याने अन् स्वत: खडसेही मैदानात नसल्याने रोहिणी खडसेंची वाट बिकट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्याचप्रमाणे भाजपसमोर स्वपक्षीय बंडखोरांचे आव्हान उभे ठाकले होते. मागील निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात 17 आमदारांना मतदारांना भाजपने घरचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे यंदा अनेक ठिकाणी दुरंगी, तिरंगी लढतींमुळे विद्यमान आमदारांसोबत ज्येष्ठ नेत्यांचे भवितव्य अधांतरी बनले होते.

नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या चार जिल्ह्यांत विधानसभेच्या 36 जागा आहेत. यंदा अगदी एकतर्फी निवडणूक होईल, असे सुरुवातीला वातावरण होते. मात्र, अखेरच्या टप्प्यात चित्र पालटले आणि बहुतांशी ठिकाणी युतीविरुद्ध आघाडी अशी चुरश निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

अभूतपूर्व बंडखोरीने निवडणुकीत भरला रंग..

Loading...

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठ्याप्रमाणात 'इनकमिंग' झाले. परिणामी युतीच्या इच्छुकांनी अभूतपूर्व बंडखोरी केल्यामुळे निवडणुकीत चांगलेच रंग भरले. त्यातील अनेक इच्छुकांनी अखेरच्या टप्प्यात काँग्रेस व राष्ट्रवादीकडे मोर्चा वळवला. मात्र, तिथेही त्यांच्या वाट्याला निराशाच पडली. त्यामुळे बंडखोरीला चांगलाच ऊत आला. जिथे सेनेला जागा आहे तिथे भाजपचे आणि जिथे भाजपला जागा आहे तिथे सेनेचे बंडखोर उभे ठाकले. विशेष म्हणजे आपापल्या पक्षातून या बंडखोरांना मित्रपक्षाविरोधात उघड उघड रसद पुरवठा झाला. त्यातून युतीविरुद्ध युती अशी विचित्र आणि अंतर्गत अस्वस्थता वाढवणारी स्थिती बनली.

काय आहे एक्झिट पोलचा अंदाज?

महाराष्ट्र विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे 24 ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी स्पष्ट होईल. News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळण्याचा अंदाज EXIT POLL मध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला 41 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो. News18 Lokmat च्या exit poll मध्ये पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य कुठेही आघाडीला जागांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

उत्तर महाराष्ट्रात 36 पैकी 31 जागांवर भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार विजयी पतका फडकावणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महायुती- 31, (भाजप-18, शिवसेना-13), महाआघाडीला-6 (काँग्रेस-5, राष्ट्रवादी-1) जागांवर यश मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, मागील विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती यंदाच्या निवडणुकीत होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससा यंदाही मतदारांनी नाकारल्याचे दिसत आहे. 2014 मधील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्र्य लढवली होती. निकाल पाहिले असता शिवसेना 07, भाजप 15, राष्ट्रवादी 05, काँग्रेस 07 तर अपक्ष 02 उमेदवार निवडून आले होते.

LIVE VIDEO : निकालाचा पहिला कल हाती, कोण आहे आघाडीवर?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 03:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...