मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानानेच, विरोधकांचा थेट सभात्याग, सभागृहात नाट्यमय घडामोडी

विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानानेच, विरोधकांचा थेट सभात्याग, सभागृहात नाट्यमय घडामोडी

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेच्याही निवडणुका होणार आहे. एकूण 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेच्याही निवडणुका होणार आहे. एकूण 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

विधानसभा अध्यक्षाच्या निवडपद्धतीवरुन सभागृहात प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्या. खरंतर विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु होण्याआधीपासूनच या मुद्द्यावरुन विरोधक आणि सरकार यांच्यात मतभेद होते.

  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 23 डिसेंबर : विधानसभा अध्यक्षांची निवड आता आवाजी मतदान पद्धतीनेच होणार असल्याचं अधिकृतपणे स्पष्ट झालं आहे. विधानसभा अध्यक्ष पदासाठी होणारं मतदान हे आवाजी पद्धतीने करण्याचा प्रस्ताव काल सभागृहात सादर करण्यात आला होता.  विधानसभा कामकाज समितीच्या या प्रस्तावाला भाजपकडून विरोध करण्यात आला होता. संबंधित प्रस्तावावर 47 शिफारसी आल्या होत्या. पण समितीने सर्व 47 शेफारस फेटाळून लावत प्रस्ताव स्वीकारला. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निवडसाठी खुल्या पद्धतीने मतदान होणार असल्याच्या वृत्तावर शिक्कोमोर्तब झालं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडसाठी 27 डिसेंबरला नोटिफिकशन निघेल. त्यानंतर 28 डिसेंबर विधानसभा अध्यक्षांची निवड होईल, अशी माहिती समोर आली आहे.

विधानसभा अध्यक्षाच्या निवडपद्धतीवरुन सभागृहात नाट्यमय घडामोडी 

विधानसभा अध्यक्षाच्या निवडपद्धतीवरुन सभागृहात प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्या. खरंतर विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु होण्याआधीपासूनच या मुद्द्यावरुन विरोधक आणि सरकार यांच्यात मतभेद होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आवाजी मतदान पद्धतीला आधीपासूनच विरोध दर्शवला होता. गेल्या साठ वर्षांपासून राज्यात विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान होत असताना अचानक नियमात बदल करणं चुकीचं असल्याचं मत फडणवीसांनी व्यक्त केलं होतं.

हेही वाचा : ओमायक्रोनची दहशत, केंद्राच्या सूचना, महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात नाईट कर्फ्यू लागू

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रस्ताव सादर, भाजपचा आक्षेप

विशेष म्हणजे अधिवेशनच्या पहिल्याच दिवसी विधानसभा कामकाज समितीने खुल्या पद्धतीने मतदान करण्याबाबतचा प्रस्ताव विधानसभेत ठेवला होता. त्यावर भाजपचे प्रचंड विरोध केला होता. भाजपकडून विधानसभा कामकाज समितीकडे तब्बल 47 शिफारसी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर विधानसभा कामकाज समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. अहवाल्याच्या बाजूने 4-3 असं मतदान झालं. विधानसभा कामकाज समितीने सर्व 47 शिफारसी फेटाळल्या. त्यानंतर संबंधित प्रस्ताव आज पुन्हा विधानसभेत ठेवण्यात आला.

भाजपचा थेट सभात्याग

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीबाबतचा प्रस्ताव विधानसभेत ठेवला. त्यावेळी विधानसभा कामकाज समितीने भाजपच्या सर्व 47 शिफारसी फेटाळण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं. तसेच विधानसभा अध्यक्षांची निवड प्रक्रिया ही आवाजी मतदान पद्धतीनेच होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. विशेष म्हणजे या निर्णयाला भाजपने विरोध केला. विरोधकांनी घोषणाबाजी करत याविरोधात थेट सभात्याग केला.

विधानसभा अध्यक्ष निवडीची तारीख राज्यपालांना सूचित केली जाणार

विधानसभा अध्यक्ष निवडीची तारीख 28 डिसेंबर ठरवण्यात आली आहे. या संदर्भातील पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना उद्या दिलं जाणार आहे. ही तारीख राज्यपालांना आधी सूचित करावी लागते. 27 डिसेंबरला उमेदवार अर्ज भरेल. त्यानंतर 28 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षपदाची खुल्या म्हणजेच आवाजी पद्धतीने निवडणूक घेण्यात येईल.

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून दोन नावांची चर्चा 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून दोन नावांची चर्चा आहे. काँग्रेसच्या हायकमांडने काँग्रेस नेते संग्राम थोपटे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावांचा प्रस्ताव पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

First published: