मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिवसेनेसाठी आज सर्वात मोठा दिवस, धनुष्यबाणाचा निकाल लागणार

शिवसेनेसाठी आज सर्वात मोठा दिवस, धनुष्यबाणाचा निकाल लागणार

फाईल फोटो

फाईल फोटो

धनुष्यबाण चिन्हा संदर्भात आज निवडणूक आयोगात अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे चिन्ह नेमकं कोणत्या गटाला मिळतं किंवा ते गोठवण्यात येतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

दिल्ली, 8 ऑक्टोबर : शिवसेनेसाठी आज खूप मोठा दिवस आहे. खरंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी आज मोठा दिवस आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 साली स्थापन केलेल्या शिवसेनेचे आज दुर्दैवाने दोन तुकडे झाले आहेत. शिवसेनेतला भलामोठा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूला गेला आहे. विशेष म्हणजे आपण शिवसेनेतच असून आपल्या पक्षाचं नाव शिवसेना आहे आणि आपलं निवडणुकीचं चिन्ह धनुष्यबाण आहे, असा दावा एकनाथ शिंदे गटाने केला आहे. दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या दाव्याला विरोध करत आहेत. खरंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेवर हे भलंमोठ संकट आहे. कारण धनुष्यबाण चिन्ह कोणत्या गटाकडे जातं हे महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे धनुष्यबाण चिन्हा संदर्भात आज निवडणूक आयोगात अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे चिन्ह नेमकं कोणत्या गटाला मिळतं किंवा ते गोठवण्यात येतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यामुळे अंधेरी पूर्व मतदारसंघाची जागा रिकामी झाली आहे. या जागेसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांनी उमेदवार जाहीर केले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने निवडणूक आयोगाला अर्ज केला आहे. या अर्जात त्यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना चिन्हाबाबतची सुनावणी तातडीने घ्यावी, अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीची दखल निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.

(शिवसेनेला आणखी एक झटका, उद्धव ठाकरेंचा जवळचा नेता एसीबीच्या रडारवर)

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला कागदपत्रे सादर करण्यासाठी आधीच वेळ दिलेला होता. पण शिवसेनेकडून शुक्रवारी पुन्हा कागदपत्रे सादर करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदतवाढीची मागणी करण्यात आली. दुसरीकडे शिंदे गटाकडून शुक्रवारी सात लाख सदस्यांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. तर शिवसेनेकडून अडीच लाख प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. शिवसेनेकडून आणखी कागदपत्रे सादर करण्यासाठी वेग मागवण्यात आलं. पण निवडणूक आयोगाने ती मागणी फेटाळले. शिवसेनेला याआधीच बराच वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेने शनिवारी म्हणजे आज दुपारी दोन वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, तसेच आपलं म्हणणं निवडणूक आयोगापुढे मांडावं, अशा स्पष्ट शब्दांत निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं.

(शिवसेनेला आता फक्त पुढच्या 21 तासांची मुदत, महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दिल्लीत प्रचंड घडामोडी)

निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आजचा दिवस शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी महत्त्वाचा आहे. शिवसेनेचा ठाकरे गट आज पुरेसे कागदपत्रे सादर करु शकली तर धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला मिळू शकतात. पण शिंदे गटाने जास्त महत्त्वाचे कागदपत्रे सादर केले आणि ठाकरे गटापेक्षा प्रभावीपणे आपली भूमिक मांडली तर उद्धव ठाकरेंना झटका बसू शकतो. कारण कोणताही पक्ष कोणाचा आहे हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे. अर्थात दी इलेक्शन सिंबॉल्स ऑर्डर, 1968 मधील 15 वे कलम आयोगाला हा अधिकार देते. निवडणूक आयोग पक्ष फुटीवर अभ्यास करते. सर्व गोष्टींचा अभ्यास करुन निवडणूक आयोगाकडून याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जातो. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून याबाबत आज हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Eknath Shinde, Election commission, Shiv sena, Uddhav Thackeray