मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिवसेना ठाकरेंची का शिंदेंची? असा होणार निर्णय, निवडणूक आयोग आयुक्तांनी सांगितली प्रक्रिया

शिवसेना ठाकरेंची का शिंदेंची? असा होणार निर्णय, निवडणूक आयोग आयुक्तांनी सांगितली प्रक्रिया

शिवसेना कुणाची तसंच शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार, याबाबत आता निवडणूक आयोगाकडे निर्णय होणार आहे. हा निर्णय कसा घेण्यात येणार याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी माहिती दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Shreyas

गांधीनगर, 27 सप्टेंबर : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलासा मिळाला आहे. शिवसेना कुणाची? तसंच शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार याचा फैसला आता निवडणूक आयोगापुढे होणार आहे. खरी शिवसेना कोणती? याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाच्या ठरलेल्या प्रक्रियेनुसार होईल, असं केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं आहे.

शिवसेना कुणाची हा निर्णय घेताना पारदर्शक अशी रूल ऑफ मेजॉरिटी म्हणजेच बहुमताचा नियम लावला जाईल, असं राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राजीव कुमार गांधीनगरमध्ये आले होते, तेव्हा त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाने आपणच खरी शिवसेना असल्याची याचिका निवडणूक आयोगात दाखल केली आहे. तसंच आपण खरी शिवसेना असल्यामुळे आपल्याला पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह मिळावं, अशी मागणीही शिंदे गटाने केली आहे.

कशी होणार सुनावणी?

एकनाथ शिंदे गटाकडून त्यांच्याकडे असलेले लोकप्रतिनिधी आणि शिवसेना पदाधिकारी यांची प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे देण्यात आली आहेत. तसंच येत्या काळात आणखी काही लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी शिंदेंकडे आले तर त्यांचीही प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे देण्यात येतील. याप्रमाणे उद्धव ठाकरे गटही त्यांच्याकडच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगापुढे सादर करतील.

निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांच्या कागदपत्रांची छाननी केली जाईल, तसंच सुनावणीवेळी दोन्ही गटांच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना निवडणूक आयोग साक्षीसाठी बोलावण्याची शक्यताही आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर ज्यांच्याकडे बहुमत असेल, त्यांच्याकडे शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह जाईल.

निवडणूक आयोगाची सुनावणी सुरू असतानाच राज्यात महापालिकांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे जर शिवसेना कुणाची हा निकाल लागू शकला नाही, तर निवडणूक आयोग शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवू शकतं. या परिस्थितीमध्ये ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना वेगळ्या चिन्हावर निवडणुका लढवाव्या लागू शकतात.

First published:

Tags: Cm eknath shinde, Election commission, Shivsena, Uddhav Thackeray