निवडणूक आयोगाने नांदेडमध्ये 12 व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनला पाठवल्या नोटीसा, तुम्ही राहा सावधान!

विधानसभेच्या रणधुमाळीत मैदानातील प्रचाराबरोबर सोशल मीडियातील प्रचार देखील अत्यंत महत्वाचा बनला आहे. पण हाच प्रचार आता अनेकांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 12, 2019 10:13 PM IST

निवडणूक आयोगाने नांदेडमध्ये 12 व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनला पाठवल्या नोटीसा, तुम्ही राहा सावधान!

नांदेड, 12 ऑक्टोबर : सोशल मिडियावर आपल्या आवडत्या उमेदवाराचा किंवा पक्षाच्या समर्थनात पोस्ट टाकत असाल तर सावधान... कारण, त्यासाठी तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.नांदेड जिल्ह्यातील अनेक व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनला निवडणूक आयोगानं नोटीस पाठवल्या आहेत.

विधानसभेच्या रणधुमाळीत मैदानातील प्रचाराबरोबर सोशल मीडियातील प्रचार देखील अत्यंत महत्वाचा बनला आहे. पण हाच प्रचार आता अनेकांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यातील 12 व्हॉट्स अ‍ॅप अ‍ॅडमिनला निवडणूक आयोगाने नोटिसा बजावल्याने खळबळ उडाली आहे.

फक्त एक क्लिक करा आणि शेकडो लोकांपर्यंत पोहोचा हे शक्य झालंय सोशल मीडियामुळे...अल्पावधीत शेकडो लोकांपर्यंत आपले म्हणने पोहोचत असल्याने निवडणुकीत सोशल मीडियाचा अत्यंत खुबीने वापर सुरू झाला आहे. अमुक व्यक्तीला विजयी करा...तमुक व्यक्तीला मतदान करू नका अश्या अनेक पोस्ट..अमुक उमेदवार किती चांगला अश्या आशयाच्या असंख्य पोस्ट व्हॉट्सअँप, फेसबुक वर फिरत आहेत.

सोशल मीडियातून उमेदवारांचे समर्थक त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. जर तुम्हीही असे काही करत असाल तर सावध व्हा! कारण, निवडणूक आयोगाने सोशल मीडियावर करडी नजर रोखली आहे. त्यातूनच नांदेड जिल्ह्यात १२ व्हॉट्स अँप अ‍ॅडमिन ला पुराव्यानिशी नोटिसा देण्यात आल्या आहेत..

Loading...

महत्त्वाचे म्हणजे ग्रुप मधील अ‍ॅडमिन नसलेल्या सदस्याने पोस्ट टाकली तरीही अ‍ॅडमिनला नोटिसा देण्यात येत आहेत तर फेसबुकवर खातेधारकाला नोटिसा देण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगाने लोकांना तक्रारी करण्यासाठी सी व्हिजिल हे अ‍ॅप देखील उपलब्ध करून दिलंय. या अ‍ॅपवर तर तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडलाय. आजवर या अ‍ॅप वर राज्यात विविध प्रकारच्या १२०० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. धक्कादायक म्हणजे यातील निम्म्या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आलं आहे. आता ज्यांना नोटिसा मिळाल्या आहेत त्यांनी मात्र यावर आक्षेप घेतला आहे. कुठंतरी एखादा व्यक्ती बसून एक क्लिक करून पोस्ट टाकतो अन् त्याची शिक्षा ग्रुप अ‍ॅडमिन किंवा उमेदवाराला होतेय हे अत्यंत चुकीचं असल्याचं महेंद्र देमगुंडे नोटीस मिळालेल्या उमेदवाराचा प्रतिनिधीचं म्हणणं आहे.

सोशल मीडियातून प्रचार करण्यासही मुभा आहे. फक्त असा प्रचार करण्यापूर्वी जिल्ह्यातील निवडणूक प्रचार समितीची पूर्वपरवानगी घेणे मात्र आवश्यक आहे. त्यामुळेच यापुढे सोशल मीडियावर कोणतीही राजकीय पोस्ट टाकताना आपण काळजी घ्यावी आणि नियमांचे पालन करावे.

=========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2019 10:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...