निवडणुकीच्या काळात राज्यात मुद्देमालच नव्हे तर 8 कोटी रुपयांचे ड्रग्सही जप्त!

निवडणुकीच्या काळात राज्यात मुद्देमालच नव्हे तर 8 कोटी रुपयांचे ड्रग्सही जप्त!

लोकसभा निवडणुकीच्या काळात राज्यात आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी 969 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच या काळात रोख रक्कम, दारु, सोने असा तब्बस 180 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.

  • Share this:

मुंबई, 2 मे- लोकसभा निवडणुकीच्या काळात राज्यात आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी 969 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच या काळात रोख रक्कम, दारु, सोने असा तब्बस 180 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.

या काळात निवडणूक आयोगाने 969 गुन्हे केले आहेत. याशिवाय स्थानिक जिल्हाधिकारी यांनी त्यात्या ठिकाणी केलेले गुन्ह्याची संख्या वेगळी आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी माहिती दिली आहे.

8 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त..

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी 969 गुन्हे दाखल  करण्यात आली आहेत. 22 हजार 470 जप्तीची प्रकरणे दाखल, 53 कोटी रुपयांची रोख रक्कम,27 कोटी रुपयांची दारु, 8 कोटी रुपयांचे ड्रग्स, 70 कोटी रुपयांचे सोने असा एकूण 158 कोटी 63 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे दिलीप शिंदे यांनी सांगितले.

प्रियांका गांधींना चावणार होता साप, पाहा हा VIDEO

First published: May 2, 2019, 4:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading