लक्षवेधी लढत असलेल्या वरळी मतदारसंघात सापडली तब्बल 4 कोटी रुपयांची रक्कम

लक्षवेधी लढत असलेल्या वरळी मतदारसंघात सापडली तब्बल 4 कोटी रुपयांची रक्कम

वरळी विधानसभा मतदारसंघातून तब्बल 4 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 19 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील विधानसबा निवडणुकीच्या प्रचारासाठीची मुदत आज संध्याकाळी 6 वाजता संपली. पण त्याचवेळी वरळी विधानसभा मतदारसंघातून तब्बल 4 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या धामधुमीत 4 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम मिळाल्याने आयकर विभागाला पाचारण करण्यात आलं. ही रक्काम निवडणुकीसाठी वापरण्यात येणार होती का, याबाबत तपास करण्यात येत आहे. पण याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण वरळी निवडणूक मतदान केंद्रच्या अधिकाऱ्यांच्या मते पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र आम्हाला काही माहीत नाही, असं वरळी पोलिसांचं म्हणणं आहे.

वरळी विधानसभा मतदारसंघाकडे यंदा राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण या मतदारसंघात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवत आहेत. त्यांना महाआघाडीकडून सुरेश माने हे आव्हान देत आहेत. तसंच 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांनीही उमेदवार अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघाची चर्चा होत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी आदर्श आचार संहिता लागू झाल्यापासून प्राप्तीकर खात्यानं मुंबईत विविध ठिकाणी छापे मारून बेहिशेबी 29 कोटी रूपयांची रोकड जप्त केली. प्राप्तीकर खाते मौल्यवान वस्तू तसेच रोख रकमेची देवाणघेवाण कुठं कुठं होत आहे, याकडे अगदी काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहे. यासाठी प्राप्ती कर खात्यानं मुंबईतल्या सर्व 36 विधानसभा मतदार संघामध्ये संवेदनशील स्थानांवर जलद प्रतिसाद पथकांची (क्विक रिस्पॉन्स टिम्स) नियुक्ती केली आहे. आचार संहिता लागू असताना कोणीही रोकड अथवा मौल्यवान वस्तूंचे वितरण करण्यास मनाई आहे.

महाराष्ट्रात दि. 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तोपर्यंत जलद प्रतिसाद पथके अखंड 24 तास कार्यरत राहणार आहेत. जर कोणाकडून रोकड वितरणासंबंधी विश्वासार्ह माहिती मिळाली की त्यावर राज्य पोलिसांचे सहकार्य घेऊन कारवाई करण्यात येत आहे. तसेच इतर कायदा अंमलबजावणी संस्थांशीही समन्वय साधून कार्य केले जात आहे, असं प्राप्तीकर खात्याच्या मुंबई विभागानं स्पष्ट केलं. विधानसभेच्या निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष वातावरणामध्ये पार पडाव्यात तसेच या काळात पैशाचा गैरवापर होवू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे.

पाऊस नाही शरद पवार बरसले, भरपावसातलं UNCUT भाषण

First published: October 19, 2019, 10:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading