साताऱ्यात होणार रणसंग्राम, लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर

साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला.

News18 Lokmat | Updated On: Sep 24, 2019 10:11 AM IST

साताऱ्यात होणार रणसंग्राम, लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसोबतच ही पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे या जागेसाठीही 21 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी होईल.

साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर साताऱ्यासह इतर भागातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. 'सर्वांचा विरोध असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना तिकीट दिलं. जनतेनंही उदयनराजेंच्या बाजूने कौल दिला. मग त्यांनी आता अवघ्या तीन महिन्यात पक्ष का सोडला,' असा प्रश्न राष्ट्रवादीकडून विचारला जात आहे.

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशानंतर शरद पवार यांनी रविवारी पहिल्यांदाच साताऱ्यात दाखल होत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात शरद पवारांचं स्वागत केलं. शरद पवारांच्या स्वागताला साताऱ्यात झालेल्या गर्दीनंतर उदयनराजेंसमोर मोठं राजकीय आव्हान उभं राहिलं आहे, अशी चर्चा आहे.

निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली, पण त्यावेळी उदयनराजेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीची मात्र घोषणा केली नाही. उदयनराजेंसाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात होतं. कारण विधानसभेसोबत साताऱ्यातील पोटनिवडणूक घेण्यात यावी, अशी अट भाजप प्रवेशावेळी उदयनराजेंनी ठेवल्याचं सांगितलं जातं. मात्र आता उदयनराजेंसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. सातारा लोकसभेची पोटनिवडणूक ही विधानसभेसोबतच होणार आहे.

उदयनराजेंचा गड भेदण्यासाठी पवार मैदानात

Loading...

उदयनराजे यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. ताकद दाखविण्यासाठी राष्ट्रवादीने सगळा जोर लावला होता. अनेक दिग्गज साताऱ्यात दाखल झाले होते. शहरातून रॅली काढून पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. आपल्या भाषणात पवार नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अपेक्षेप्रमाणच पवारांनी उदयनराजेंतं नाव न घेतला त्यांच्यावर सडकून टीका केली आणि विधानसभा निवडणुकीत घरा घरात घड्याळ पोहोचवा असा आदेश कार्यकर्त्यांना दिला.

'पूर्वी बादशहाच्या दरबाराला लाथ मारणारा राजा होता आणि आज टीव्हीवर पाहिलं कोणी कोणाला पगडी घातली ते. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर चालणारा कधी चुकीचा रस्ता धरणार नाही. असं करणार्‍यांना आम्ही रस्ता दाखविणार आहोत,' असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला आहे.

VIDEO : हेल्मेट घालून केली चोरी; विदेशी दारूसह 50000 लुटतानाची दृश्य CCTV मध्ये कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 10:07 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...