Election 2019 उद्धव ठाकरेंच्या भाषणात मुंबई पूल दुर्घटनेचा उल्लेख नाही

Election 2019 उद्धव ठाकरेंच्या भाषणात मुंबई पूल दुर्घटनेचा उल्लेख नाही

या भाषणात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं.

  • Share this:

अमरावती 15 मार्च  : भाजप आणि शिवसेनेचा पहिला संयुक्त मेळावा शुक्रवारी अमरावतीत झाला. त्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. गुरूवारी रात्री मुंबईत झालेल्या पूल दुर्घटनेच्या घटनेची छाया या मेळाव्यावर होती. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला होत.

मात्र आपल्या संपूर्ण भाषणात त्यांनी मुंबईतल्या दुर्घटनेचा साधा उल्लेखही केला नाही. मुंबईतलच नाही तर देशात सर्वात मोठं रेल्वे स्थानक असणाऱ्या सीएसएमटी ला जोडणारा हा पूल हा मुंबई महापालिकेचा होता त्यामुळे त्याची जबाबदारी शिवसेनेवर आहे अशी मुंबईकरांची भावना आहे.

या भाषणात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. गेली चार वर्षी सातत्याने मोदींवर तुटू पडणारे उद्धव ठाकरे आज पंतप्रधानांचं कौतुक करताना पाहून शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांनाही आश्चर्य वाटत होतं.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

मी सर्व्हेवर विश्वास ठेवत नाही आत्मविश्वासावर विश्वास ठेवतो.

जेव्हा काहीही नव्हतं तेव्हा एकदिलाने काम करत होतो.

मी फक्त भगवा ओळखतो. आता जे करायचं ते मनापासून करायचं

टीका करायची कोणावर हा प्रश्न. आपण सगळे बाळासाहेबांचे सैनिक आहोत.

शिवसेना भाजप देशाला तारणा़रे पक्ष. टीका करू कोणावर. वडील एक बोलतायत आणि मुलगा दुसरच बोलतोय.

पंतप्रधानांना अजूनही नरेंद्रभाईच म्हणतो. आपला भाऊ असावा अशी व्यक्ती आज पंतप्रधान आहे.

First published: March 15, 2019, 2:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading