महाराष्ट्राला 4 वर्षानंतर मिळू शकतं उपमुख्यमंत्रिपद, कोण मारणार बाजी?

महाराष्ट्राला 4 वर्षानंतर मिळू शकतं उपमुख्यमंत्रिपद, कोण मारणार बाजी?

लोकसभा निवडणुकीचे निकाल अनेक अर्थाने महत्त्वाचे ठरणार आहे. याच निकालानंतर महाराष्ट्राला उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 16 मे : लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर महाराष्ट्रात आता राजकीय पक्षांनी विधासभेची तयारी सुरू केली आहे. अशातच गेल्या चार वर्षांपासून नेमल्या न गेलेल्या उपमुख्यमंत्रिपदावरून आता चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल अनेक अर्थाने महत्त्वाचे ठरणार आहे. याच निकालानंतर महाराष्ट्राला उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे. भाजपने शिवसेनेच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापण केली असली तरी कोणालाही उपमुख्यमंत्री करणं टाळलं आहे. पण आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पदावर नेमणूक होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत जर शिवसेनेला चांगलं यश मिळालं तर उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे दिलं जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास शिवसेनेकडून कुणाला संधी देण्यात येणार, याबाबत मोठी उत्सुकता आहे. याबाबत लोकसत्ता या दैनिकाने वृत्त दिलं आहे.

दुसरीकडे, दिल्लीत मात्र पंतप्रधानपदासाठी हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आघाडीतील सर्व पक्षांची बैठक बोलवली आहे. यासाठी स्वत: सोनिया गांधी यांनी सर्वांना वैयक्तीक पत्र लिहले आहे. इतक नव्हे तर जे पक्ष UPA आणि NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी)चा भाग नाहीत त्यांना देखील सोनिया गांधी यांनी पत्र लिहले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी 19 मे रोजी मतदान होत आहे. तर निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे. निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुतम मिळणार नाही असा अंदाज अनेक सर्व्हेतून व्यक्त केला गेला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदींना चेकमेट करण्यासाठी खुद्द सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने निवडणुकीच्या आधीच सरकार स्थापन करण्यासाठी हलचाल सुरू केल्या आहेत. सोनिया गांधी यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांनी 23 मे रोजी होणाऱ्या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.

विशेष म्हणजे 23 तारखेलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे निकालानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर तातडीने निर्णय घेण्याची काँग्रेसची योजना असल्याचे दिसून येते. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सूत्रांकडून समजते.

या बैठकीसाठी वायएसआर काँग्रेसचे जगन मोहन रेड्डी, डीएमके प्रमुख एम.के.स्टॅलिन यांना बोलवण्यात आले आहे.

VIDEO: मतदानानंतर भाजपने दिलेल्या आव्हानाबद्दल पहिल्यांदाच बोलल्या सुप्रिया सुळे

First published: May 16, 2019, 1:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading