राष्ट्रवादीने सामंजस्याने घेतलं असतं तर ही वेळ आली नसती - अशोक चव्हाण

राष्ट्रवादीने सामंजस्याने घेतलं असतं तर ही वेळ आली नसती - अशोक चव्हाण

'बहुजन वंचित आघाडीसाठी आमची दारे आणि खिडक्या अजून उघड्या आहेत.'

  • Share this:

मुजीब शेख, नांदेड 12 मार्च  : सुजय विखे पाटील यांचा भाजपा प्रवेश काँग्रेससाठी धक्का मानला जातो पण हा धक्का नाही, राजकारणात  कमी जास्त प्रमाणात अशा गोष्टी घडत असतात अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

अशोक चव्हाण म्हणाले, सुजयच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला फारसा फरक पडणार नाही. मात्र सुजय यांचा भाजपा प्रवेश दुर्दैवी आहे. मुख्यमंत्र्यांची फोडाफोडीची नीती लोकशाहीला मारक आहे. ही त्यांची साम दाम दंड भेदाची ही नीती असल्याचेही चव्हाण म्हणाले.

राष्ट्रवादीने सामंजस्य दाखवलं नाही

ते पुढे म्हणाले, सुजयने थोडा विचार करायला हवा होता. शिवाय राष्ट्रवादीने सामंजस्याची भूमिका घेतली असती तर हा प्रसंग आला नसता अशी खंत देखील अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. सुजय यांच्या पक्ष प्रवेशावरून राधाकृष्ण विखे पाटलांवर काही कारवाई होणार का अस विचारले असता, याबाबतीत मी काहीही प्रतिक्रिया देणार नाही असं ते म्हणाले. पण या पक्ष प्रवेशाची दखल पक्षाध्यक्ष  राहुल गांधी यांनी घेतली आहे. याबाबतीत त्यांनी काल आपल्याशी चर्चा केल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली.

प्रकाश आंबेडकरांसाठी दारं उघडी

बहुजन  वंचित आघाडीसाठी आमची दारे आणि खिडक्या अजून उघड्या आहेत. त्यांनी फेरविचार करावा आणि महाआघाडीत यावं अशी आपली जाहीर विनंती बाळासाहेबाना असल्याचंही चव्हाण  म्हणाले. आम्ही अजूनही जागावाटपाबाबत निर्णय घेतला नाही. बाळासाहेबांच्या या भूमिकेमुळे सेना भाजपाला फायदा होणार आहे. सेना भाजपा विरोधात लढायचं असेल, त्यांचा फायदा होऊ द्यायचा नसेल तर आंबेडकर यांनी थोडी नमती भूमिका घ्यावी.

शेट्टींनी आघाडीत यावं

राजू शेट्टी यांनी तीन जगाची काँग्रेस राष्ट्रवादीकडे मागणी केली. पण त्यांना एकूण दोन जागा देण्याचे आम्ही मान्य केलं. त्यांची आणि आपली याबाबतीत चर्चा झाली. राजू शेट्टीनी महाआघाडीत यावं यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

First published: March 12, 2019, 8:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading