प्रसिद्ध गायक आनंद शिंदेंची राजकारणात एन्ट्री; 'या' जागेवरून निवडणूक लढवण्याची शक्यता

प्रसिद्ध गायक आनंद शिंदेंची राजकारणात एन्ट्री, महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची स्वीकारली जबाबदारी

News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2019 07:03 PM IST

प्रसिद्ध गायक आनंद शिंदेंची राजकारणात एन्ट्री; 'या' जागेवरून निवडणूक लढवण्याची शक्यता

सोलापूर, 28 ऑगस्ट: प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी नुकताच राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सोलापुरात बुधवारी (28 ऑगस्ट)रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली.सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ व सोलापूर शहर मध्य हे मतदारसंघ राखीव आहेत. त्यामुळे या राखीव मतदारसंघातून आनंद शिंदे निवडणूक लढवणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. राजकारणातून समाजकारण करण्यासाठी मी ही जबाबदारी स्वीकारत आहे अशी प्रतिक्रिया आनंद शिंदे यांनी दिली.

आठवड्याभराआधी आनंद शिंदे आणि त्यांच्या मुलाला शिवसेनेतून विधानसभेतून निवडणूक लढवावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑफिर दिली होती. आठवड्याभरापूर्वी मातोश्रीवर याबाबत बैठक झाल्याची माहिती होती. उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासाठी पिंपरी आणि मोहोळ या आरक्षित विधानसभा मतदारसंघाचं तिकीट देण्याची तयारी दर्शवली होती. आनंद शिंदेंनी मात्र त्या बैठकीत आपल्याला निवडणूक लढवण्यात रस नसल्याचे स्पष्ट केले होते.  याशिवाय राष्ट्रवादी आणि आरपीआयकडूनही प्रस्ताव आला असल्याची माहिती होती.

VIDEO: खासदार अमोल कोल्हेंनी सुरेश धस यांची उडवली खिल्ली

दरम्यान मंगळवारी 27 ऑगस्ट रोजी आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात झाला होता. त्या अपघातातून थोडक्यात बचावले असून यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली होते.त्यांच्या गाडीचं प्रचंड नुकसान झालं आहे. मुंबईहून सांगोल्याच्या दिशेनं जात असताना इंदापूरजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला.  इंदापूरमधील खासगी दवाखान्यात उपचार घेऊन शिंदे सांगोल्याकडे रवाना झाले आहेत. मंगळवारी (27 ऑगस्ट पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ हा अपघात झाला होता.

बोटीत जाण्याआधी भरधाव ट्रक कोसळला थेट समुद्रात, VIDEO व्हायरल

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 01:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...