Home /News /maharashtra /

शरद पवार यांनी मनसे आणि राज ठाकरेंबद्दल केलं मोठं विधान

शरद पवार यांनी मनसे आणि राज ठाकरेंबद्दल केलं मोठं विधान

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगलं यश मिळवलं तरीही राजकीय वातावरण अजून तापलेलं आहे. त्यातच शरद पवार (Sharad Pawar interview)यांनी एका मुलाखतीत राज ठाकरे (Raj Thckeray) आणि राहुल गांधी यांच्याबद्दल वक्तव्य केलं आणि राजकीय चर्चांना आणखी उधाण आलं.

पुढे वाचा ...
    मुंबई, 05 डिसेंबर : महाराष्ट्रात नुकत्याच विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या असून या निवडणुकीत (Election result) महाविकास आघाडीने जोरदार विजय मिळवला आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण बरंच तापलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी दिलेली एक मुलाखत गाजते आहे. त्यात त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंबद्दल मत मांडलं तसंच सध्याच्या काँग्रेसबद्दलही मतप्रदर्शन केलं. लोकमत मीडियाचे चेअरपर्सन विजय दर्डा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार(sharad pawar) यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत शरद पवार यांनी अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिली आहेत. याबद्दलची बातमी लोकमतने दिली आहे. त्यांना राज ठाकरेंच्या (raj Thackeray) क्रेझबद्दल विचारलं असता, त्यांनी सांगितलं की, 'राज ठाकरे यांचा वेगळा पक्ष आहे. ते नेहमी आपली मतं स्पष्टपणे मांडत असतात आणि त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. त्यांना निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नसलं तरी याचा अर्थ असा नाही होत की त्यांची तरुणांमधली क्रेझ संपली. राज यांची क्रेझ कायम आहे.' 12 डिसेंबरला शरद पवार यांचा वाढदिवस असतो. या निमित्ताने त्यांची ही मुलाखत घेण्यात आली होती. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर गप्पा मारल्या आणि राजकीय भाष्यही केलं. राहुल गांधी यांच्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, 'काँग्रेसमधील बरेच नेते आजही गांधी आणि नेहरूंचा वारसा जपतात. सोनिया आणि राहुल हे दोघेही याच घराण्याचे आहेत. आणि कुठल्याही राजकीय पक्षातील लोकांमध्ये नेतृत्वाची मान्यता किती आहे, यावरून नेतृत्व ठरत असते. वस्तुस्थिती अशी आहे की, बहुतांशी काँग्रेसजनांना राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचं नेतृत्व मान्य आहे.' अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांच्या पुस्तकात (A Promised Land)राहुल गांधींबाबत केलेल्या टिपण्णी बाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, 'आपण प्रत्येकाचा दृष्टीकोन स्वीकारला पाहिजे. ते मत बराक ओबामा यांचं आहे.' आपण आपल्या देशातील नेतृत्वाबद्दल काहीही म्हणू शकतो. पण दुसऱ्या देशातील नेतृत्वाबाबत बोलणार नाही. मला वाटतं की ओबामा यांनी मर्यादा ओलांडली आहे, असंही शरद पवार या मुलाखतीत म्हणाले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Raj Thackeray, Sharad pawar

    पुढील बातम्या