मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्व बाजुला ठेवलं त्यांनी.... मुख्यमंत्र्यांचं उद्धव ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर

ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्व बाजुला ठेवलं त्यांनी.... मुख्यमंत्र्यांचं उद्धव ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत शिंदे, फडणवीस सरकारवर घणाघात केला. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडतोड उत्तर दिले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ajay Deshpande

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर घणाघात केला. सोबतच त्यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर देखील जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही.  गेल्या चार महिन्यांपासून राज्यात बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आहे, सुरू असलेलं काम पाहून त्यांच्या छातीत धडकी भरली त्यामुळे हे सर्व प्रकार सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

'त्यांनी महाराजांबाबत बोलू नये'  

दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सत्तेतून बाहेर पडावे असंही उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर देखील एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांची मोडतोड केली. ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्व बाजुला सारलं त्यांनी महाराजांबद्दल बोलू नये असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं होतं? 

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आज शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. कोणीही यावे आणि टपली मारून जावे अशी सध्या राज्याची अवस्था झाली आहे.  राज्यात मिंधे आणि खोके सरकार आल्यापासून राज्याची अवहेलना सुरू आहे.  अनेक उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. राज्याला मुख्यमंत्री आहेत का असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Shiv sena, Uddhav Thackeray