Home /News /maharashtra /

'एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंपेक्षा सरस ठरतील', बंडखोर आमदाराने शिवसेनेला डिवचलं

'एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंपेक्षा सरस ठरतील', बंडखोर आमदाराने शिवसेनेला डिवचलं


आमचे घराणे बंडखोरीचे, त्यामुळे सामान्य माणसासाठी धोका पत्कारला. बंडा दरम्यान अपक्ष कोणीही शिवसेनेच्या संपर्कात नव्हते.

आमचे घराणे बंडखोरीचे, त्यामुळे सामान्य माणसासाठी धोका पत्कारला. बंडा दरम्यान अपक्ष कोणीही शिवसेनेच्या संपर्कात नव्हते.

आमचे घराणे बंडखोरीचे, त्यामुळे सामान्य माणसासाठी धोका पत्कारला. बंडा दरम्यान अपक्ष कोणीही शिवसेनेच्या संपर्कात नव्हते.

    कोल्हापूर, 06 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) हे तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे, त्यामुळे चांगला कारभार करतील. ते उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा सरस ठरतील, असं म्हणत बंडखोर आमदार आणि माजी राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर (rajendra patil yadravkar) यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झालेले राजेंद्र पाटील यड्रावकर हे मतदार संघात परतले आहेत. बंडात सहभागी होताना काय धाकधूक होती, बंड फसले असते तर काय झाले असते. संजय राऊत यांच्याकडून जी वक्तवे केली जात होती त्याचे परिणाम कसे होत होते. या सगळ्या गोष्टींचा उलगडा यड्रावकर यांनी केला. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे निधी देत नव्हते भेट देत नव्हते हे सत्य आहे. आमदारांच्या तक्रारी खऱ्या आहेत. अपक्ष निवडून आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मी सेनेला पाठिंबा दिला होता. माझी कमेटमेंट एकनाथ शिंदे यांच्यांशी आहे, असा खुलासाच यड्रावकर यांनी केला. (शपथपत्र लिहून देणारे शाखाप्रमुख शिंदे गटाकडे निघाले, शिवसेनेची भिंतही कोसळली!) आमचे घराणे बंडखोरीचे, त्यामुळे सामान्य माणसासाठी धोका पत्कारला. बंडा दरम्यान अपक्ष कोणीही शिवसेनेच्या संपर्कात नव्हते. राजकारणातील वक्तव्याची पातळी घसरली आहे. आम्ही गुवाहाटीला होतो त्यादरम्यान ज्या घटना घडल्या, वक्तव्यं आली त्या महाराष्ट्राला शोभतील आशा नाहीत, असं म्हणत यड्रावकर यांनी संजय राऊत यांच्यावर नाराजी व्यक्त केली. शहाजीबापूंना हॉटेल झाडीचे आकर्षण होते त्यामुळे ते बोलले होते. पण लोकांनी उगाच ते व्हायरलं केलं. आमदार अबीटकर यांच्या बाबत पळून जाण्याची घटना घडली नाही, जे घरी जात होते त्यांना चार्टर फ्लाईटने पाठवले होते.  बंडात सहभागी असलेल्या एकालाही जबरदस्तीने आणलेले नव्हते, असा खुलासाही यड्रावकर यांनी केला. (म्हणून पुरुषांनी लोणचं खायचं नसतं; प्रॉब्लेम होण्यापूर्वीत व्हा अलर्ट) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला ही बातमी आम्हाला गोव्यात विमान हवेत असतानाच समजली होती. एकनाथ शिंदे हे तळागाळातील व्यक्ती त्यामुळे चांगला कारभार करतील. ते उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा सरस ठरतील, असं म्हणत यड्रावकर यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या