मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO: एकनाथ शिंदेंनी घेतला तळीये गावातील परिस्थितीचा आढावा; आर्थिक मदतीसह पुनर्वसनाबाबत दिली प्रतिक्रिया

VIDEO: एकनाथ शिंदेंनी घेतला तळीये गावातील परिस्थितीचा आढावा; आर्थिक मदतीसह पुनर्वसनाबाबत दिली प्रतिक्रिया

तळीये गावात 35 घरांवर दरड कोसळून 38 जणांचा मृत्यू (38 people died due to landslide) झाला. शुक्रवारी रात्री उशिरा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तळीये गावात पोहोचले (Eknath Shinde visits Tilaye village).

महाड, 24 जुलै : शुक्रवारचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट ठरला. राज्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये अनेकांनी आपले प्राण गमावल. महाडमध्येही मुसळधार पावसात मोठी दुर्घटना (Big tragedy in mahad) घडली. महाडमधील तळीये गावावर दरड कोसळली. या घटनेत तब्बल 35 घरांवर ही दरड कोसळून 38 जणांचा मृत्यू (38 people died due to landslide) झाला. घटनेत 52 जण अजूनही बेपत्ता आहेत. अशात शुक्रवारी रात्री उशिरा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तळीये गावात पोहोचले (Eknath Shinde visits Tilaye village).

एकनाथ शिंदे यांनी गावातील परिस्थितीचा आढावा घेतला. आज सकाळपासून पुन्हा एकदा बचावकार्याला सुरुवात होत आहे. परिस्थितीची पाहणी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, की मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखाची नुकसानभरपाई दिली जाईल. तर, या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर प्रशासनाकडून उपचार केले जातील. यासोबतच बाधित भागात पुनर्वसनाचे कामही केले जाईल, असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

अखेर 'त्या' 390 जणांना मिळणार खरी कोरोना लस, मुंबईत 9 बनावट लसीकरण प्रकरणं उघड

गेल्या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरीत झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. चक्क 10 ते 15 फूट रस्त्यांवर आणि वस्त्यांत पाणी शिरल्याचं पहायला मिळालं. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सावित्री नदीला ढगफूटी सदृश्य अतीमुसळधार पावसाने, महापूर परीस्थिती निर्माण केली. सावित्री नदीला आलेल्या महापूरामुळे महाड शहर पुर्णपणे पाण्याखाली गेलं.

राज्यावर दोन वर्षांत आली वादळं आणि संकट, पण केंद्राची मदत अजूनही प्रतिक्षेतच!

दुसरीकडे रत्नागिरीत आलेल्या महापुराचा फटका कोविड रुग्णालयाला बसला असून तब्बल 8 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती शुक्रवारी उघड झाली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ऑक्सिजन अभावी या रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या कोविड रुग्णालयाला चहूबाजुंनी पाण्याने वेढल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

First published:

Tags: Raigad, Rain, Rain flood