Home /News /maharashtra /

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, शरद पवारांना आनंद, Tweet मध्ये म्हणाले...

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, शरद पवारांना आनंद, Tweet मध्ये म्हणाले...

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) होणार आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही घोषणा करत सगळ्यांनाच धक्का दिला. मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 30 जून : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) होणार आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही घोषणा करत सगळ्यांनाच धक्का दिला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 39 आणि 11 अपक्ष असे एकूण 50 आमदारांसह बंड केलं. एकनाथ शिंदे यांच्या या बंडानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला. यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, हे निश्चित मानलं जात होतं. पण राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला. देवेंद्र फडणवीस यांनी चकवा देत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार याची घोषणा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी ट्वीट केलं आहे. एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो. स्व. यशवंतराव चव्हाण, श्री. बाबासाहेब भोसले, श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे, असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे. काय म्हणाले फडणवीस? एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मेट्रो, आरक्षण हे सर्व विषय सोडवतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 2019 ला आम्ही एकत्र लढलो आणि 170 जागांवर विजय मिळवला, पण दुर्दैवाने त्यावेळी आमच्या मित्रांनी दुसऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेबही आजन्म त्या माणसांबरोबर गेले नाहीत. ज्यांनी हिंदूत्व आणि सावरकरांना विरोध केला, त्यांच्याबरोबर हे गेले, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांचे आभार मानले. "देवेंद्र फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला. त्यांनी शिवसैनिकाला पाठिंबा दिला. खरंतर त्यांना 120 आमदारांचा पाठिबा होता. पण तरीही त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला", असं एकनाथ शिंदे म्हणाले.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Devendra Fadnavis, Eknath Shinde, Shivsena, शरद पवार. sharad pawar

    पुढील बातम्या