Home /News /maharashtra /

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याची फडणवीसांची घोषणा, शिवसेना सायलेंट मोडमध्ये!

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याची फडणवीसांची घोषणा, शिवसेना सायलेंट मोडमध्ये!

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) होतील, असं सांगून भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा बॉम्ब टाकला, मात्र याचे हादरे शिवसेनेला (Shivsena) बसले आहेत. शिवसेनेकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

पुढे वाचा ...
    मुंबई, 30 मुंबई : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) होतील, असं सांगून भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा बॉम्ब टाकला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे (Shivsena) 39 आणि 11 अपक्ष असे एकूण 50 आमदारांसह बंड केलं. एकनाथ शिंदे यांच्या या बंडानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला. यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, हे निश्चित मानलं जात होतं, पण भाजपने वेगळीच खेळी खेळली. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी घोषणा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली. एवढच नाही तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी ट्वीट करून एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं. पण शिवसेनेकडून मात्र अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरूनही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नेहमीच माध्यमांशी संवाद साधणारे संजय राऊतही (Sanjay Raut) शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या घोषणेनंतर अजून काही बोललेले नाहीत. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केलं तेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनीही भाजप तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहे का? असे सवाल उपस्थित करत होते. तसंच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होत असतील, तर आम्ही पाठिंबा देऊ, असंही शिवसेनेकडून बोललं गेलं होतं. उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आलं आहे, पण शिवसेनेकडून शपथविधीला कोणीही जाणार नसल्याची माहिती मिळत आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या