मुंबई, 30 जून : उद्धव ठाकरे (UDDHAV THACKERAY) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा (uddhav thackeray resign chief minister) दिल्यानंतर भाजपने (bjp) सत्ता स्थापनेसाठी तयारी सुरू केली आहे. दुपारी २ वाजेपर्यत एकनाथ शिंदे (eknath shinde) हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (oppostion leader devendra fadanvis) यांच्या सागर या निवासस्थानी भेटणार असल्याचे सांगण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात आपल्याला सागर या निवासस्थानी बैठक होईल असेही सांगण्यात आले आहे. एकनाथ शिंदे गोव्यातील हॉटेलमधून मुंबईकडे रवाना (Eknath Shinde leaves Goa for Mumbai) झाल्याने त्यांची पुढची भुमीका काय असणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
एकनाथ शिंदे गोव्याला रवाना झाल्याने राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. भाजपच्या आमदारांची सागर बंगल्यावर बैठक सुरू आहे. या बैठकीत काय निर्णय होणार याबाबत पुढच्या काही काळात समजणार आहे दरम्यान शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही बोलले जात आहे. ते मुंबईत आल्यावर कोणाकोणाची भेट घेणार याकडेही सगळ्याचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे गट आणि भाजप हे सत्ता स्थापनेसाठी एकत्र येऊन काय निर्णय घेणार यावरही सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
हे ही वाचा : एकनाथ शिंदेंनी 39 आमदारांना घेऊन केलं बंड, फडणवीस सरकारमध्ये फक्त 13 जणांना मिळणार संधी?
शिंदे गटाचे मंत्री कोण?
राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या मंत्रिमंडळात भाजपाचे 28 तर शिंदे गटाचे 12 मंत्री असतील. एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, संजय राठोड, दीपक केसरकर, शंभूराज देसाई या शिंदे गटाच्या नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते. तर बच्चू कडू, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाठ आणि भारत गोगावले या शिंदे गटातील मंत्र्यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
भाजपामधून मंत्री कोण?
भारतीय जनता पक्षामध्ये मंत्रिपदासाठी मोठी चुरस आहे. कॅबिनेट मंत्रीपदासाठी चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची नावं कॅबिनेट मंत्रिपदासाठी नक्की मानली जात आहेत. त्याचबरोबर प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, संभाजी पाटील निलंगेकर यांचीही नावं कॅबिनेट मंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. तर राज्यमंत्रीपदासाठी नितेश राणे, प्रशांत ठाकूर, मदन येरावर, निलय नाईक, गोपीचंद पडाळकर यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : 'जय महाराष्ट्र' म्हटल्यामुळे रंगली राजीनाम्याची चर्चा, अखेर संजय राऊत म्हणाले...
अजित पवार की जयंत पाटील कोण होणार विरोधी पक्षनेता?
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याला कारणीभूत असलेले एकनाथ शिंदे (eknath shinde) सत्ता स्थापनेची तयारी करत आहेत. दरम्यान दुसरीकडे विधानसभा विरोधी पक्ष नेत्यांसाठी (Leader of the Opposition in the Assembly) आज एनसीपीची (ncp meeting) बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार (ajit pawar) किंवा जयंत पाटील (jayant patil) यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसपेक्षा (congress leader) जास्त आमदार असल्याने एनसीपीला (ncp) विरोधी पक्षनेते पद मिळणार असल्याचे चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Goa, Mumbai, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)