Home /News /maharashtra /

Eknath Shinde Shiv Sena : बंडखोर आमदारांची मनस्थिती ढळू नये म्हणून एकनाथ शिंदे करतात हा आटापिटा?

Eknath Shinde Shiv Sena : बंडखोर आमदारांची मनस्थिती ढळू नये म्हणून एकनाथ शिंदे करतात हा आटापिटा?

एकनाथ शिंदे (eknath shinde shiv sena) यांनी शिवसेनेत (shiv sena leader in guwahati) बंडखोरी करत 40 आमदारांना गुवाहाटी येथे गेले आहेत.

  मुंबई, 28 जून : मागच्या आठदिवसांपासून एकनाथ शिंदे (eknath shinde shiv sena) यांनी शिवसेनेत (shiv sena leader in guwahati) बंडखोरी करत 40 आमदारांना गुवाहाटी येथे गेले आहेत. शिवसेनेतील प्रमुख नेत्यांसह आमदारांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी (mahavikas aghadi) धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. गुवाहाटी येथे आमदारांचा मुक्काम वाढल्याने आमदारांची नाराजी होऊ नये किंवा आमदारांमध्ये कोणताही वाद झाला तर त्यावर पडदा टाकण्यासाठी एकनाथ शिंदे (eknath shinde) स्वत: प्रत्येकाची भेट घेत त्यांची मनधरणी करत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान हॉटेलमध्ये नेमकं एकमेकांशी कसा संवाद साधला जातो तेथील खेळीमेळीचे वातावरण कसे सुरू आहे. एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांची मनस्थिती ढळू नये काय प्रयत्न करत आहे याबाबत मटाला सुत्रांनी माहिती दिली आहे.

  शिवसेनेमधून बाहेर पडलेल्या आमदारांच्या मनात कोणतीही नकारात्मकता येऊ नये यासाठी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे दररोज आमदारांची एक बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधतात, अशी माहिती गुवाहाटी येथे असलेल्या एका आमदाराने 'मटा'शी बोलताना दिली. आमदारांची मानसिक स्थिती ढळू नये तसेच घेतलेल्या निर्णयावर सर्व आमदार ठाम राहावेत, यासाठी त्यांचे राजकीय भवितव्य कसे सुरक्षित आहे याची उदाहरणेही बैठकांमधून दिली जात आहेत.

  हे ही वाचा : 8 महिन्यापूर्वीच ठरला बंडखोरीचा कट, शिंदेंच्या पाया पडणाऱ्या मंत्र्याने दिली होती कल्पना, सेना नेत्याचा खुलासा

  आमदारांची मनस्थिती सांभाळण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे पार पाडत असताना गुवाहाटीमधील हॉटेलमधून आमदार विनाकारण बाहेर पडू नयेत तसेच हॉटेलमध्ये अनोळखी व्यक्ती शिरू नये याची जबाबदारी खुद्द आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्व सरमा पार पाडत आहेत, असेही सूत्रांनी सांगितले.

  राज्यातील सत्तासंघर्षाचा खेळ लगेचच संपुष्टात येणार नसल्याचा अंदाज एकनाथ शिंदे यांना असल्याने सुरुवातीपासूनच ते त्यांच्या सोबतच्या आमदारांसोबत सातत्याने संवाद साधत आहेत. प्रत्येक आमदार आपापल्या मनातील शंकांचे समाधान करण्यासाठी शिंदे यांच्यासोबत वैयक्तिकरित्या संवाद साधत असला तरी सर्व आमदारांना एकत्रित बोलावून एकनाथ शिंदे रोज त्यांच्याशी संवाद साधत असल्याचे खात्रीलायकरित्या मटाला समजते आहे.

  हे ही वाचा : 'जनामनाची लाज असती तर मंत्रीपदाचे राजीनामे दिले असते'; शिवसेनेनं बंडखोरांना पुन्हा सुनावलं

  विशेष म्हणजे या बैठकांमधले वातावरण हलके फुलके राहील याची कटाक्षाने काळजी घेतली जात आहे. घरच्यासारखे वातावरण असावे यासाठी भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. यामध्ये खुद्द एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या तोंडात केक भरवत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

  सर्व काही सुनियोजित

  आमदारांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत बोलण्याची पूर्ण मुभा आहे. केवळ हॉटेलच्या लॉबीमध्ये येताना विनाकारण मोबाइल घेऊन येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. लॉबीमध्ये एखादा नवा आमदार आला तसेच सर्व आमदार एकत्र जमले असतील, अशावेळी हा फोटो कोणी काढायचा तसेच तो कोणी प्रसारमाध्यमांना पाठवायचा या सर्व गोष्टी आधीच ठरविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळेच आत्तापर्यंत या बंडखोर आमदारांची अनावश्यक माहिती बाहेर येताना दिसत नसल्याचे समजते.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Eknath Shinde, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या