मुंबई, 22 जून : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (shivsena leader eknath shinde) यांच्या नाराजी नाट्यावरून बरेच तर्क वितर्क लावले जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत किती आमदार (eknath shinde mla) याबाबत शंका व्यक्त केली जात होती परंतु शिंदेसोबत असलेल्या आमदारांचा फोटो व्हायरल झाल्याने एकूण दिशा स्पष्ट झाली. शिंदे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई (Party action) होणार का यावर जोरात चर्चा सुरू आहे पण एकनाथ शिंदे (eknath shinde Guwahati) बहुमत स्पष्ट करताना किती आमदार समोर आणतात यावर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होणार आहेत.
दरम्यान शिवसेनेचे मंत्री बच्चू कडू यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेचे 33 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत तर 7 च्या आसपास अपक्ष आमदार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान हा आकडा वाढणार असल्याचे बोलले जात आहे. जवळपास 50 च्या आसपास आमदार आमच्यासोबत येणार असल्याचे बच्चून कडू यांनी माहिती दिली.
हे ही वाचा : महाराष्ट्राशी बेइमानी करणाऱ्यांचे काय होणार? 'सामना'च्या अग्रलेखातून सवाल
पक्षातर्गत कारवाई होणार का?
कुठल्याही आमदाराने पक्षाविरोधात बंडखोरी केल्यास त्याच्यावर पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते. तसेच त्याची आमदारकी रद्द होऊ शकते. मात्र जर एखाद्या पक्षाच्या सभागृहातील एकूण सदस्य संख्येपेक्षा दोन तृतियांशहून अधिक सदस्यांनी पक्षांतर केल्यास किंवा त्या सदस्यांनी वेगळा गट स्थापन केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही. सध्या शिवसेनेचे विधानसभेच 55 आमदार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदें यांनी किमान 36 ते 37 आमदारांचा गट बनवल्यास त्यांचं सदस्यत्व कायम राहील. तसेच शिवसेनेचा वेगळा गट म्हणून त्यांना मान्यताही मिळणार आहे यामुळे एकनाथ शिंदे यांनी बहुमत स्पष्ट केल्यास त्यांच्यावर पक्षातर्गत कारवाई होण्याचे टळू शकते.
एकनाथ शिंदे आपल्यासह ३३ आमदारांना घेऊन आता गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. सर्व आमदारांना गुवाहाटीमध्ये रेडिसन ब्लु या हॉटेलमध्ये ठेवले आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल यांची भेट घेण्याची तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदे आजच भेटायची तयारी केली आहे. स्पेशल विमानानं, गुवाहाटीवरून मुंबईत दाखल होणार आहे. त्यांच्या बंदोबस्तासाठी CISF च्या 6 तुकड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत. विमानतळ ते राजभवन प्रवासाला Cisf ची सुरक्षा असणार आहे.
हे ही वाचा : शिवसेना आमदार उडाले भुर्रर्र...; आता गुवाहाटी ठरणार महाराष्ट्राच्या सत्ताबदलाचा पट
आधीच शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची निवड केली आहे. पण सेनेकडे फक्त १७ आमदार असल्याचे पत्र दिले होते. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त आमदार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे दावा करू शकतात. त्यांच्या दाव्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)