मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'शिंदे सरकार'चं पहिलं अधिवेशन, आदित्य ठाकरे पहिल्याच दिवशी दांडी मारणार, कारण...

'शिंदे सरकार'चं पहिलं अधिवेशन, आदित्य ठाकरे पहिल्याच दिवशी दांडी मारणार, कारण...

मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर आता शिंदे सरकारचं पहिलं अधिवेशन सुरू होत आहे. 17 ऑगस्टपासून मुंबईत पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे, पण या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) उपस्थित नसतील.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 15 ऑगस्ट : जून महिन्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकांनंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे 40 आणि अपक्ष 10 अशा 50 आमदारांना घेऊन बंड केलं. एकनाथ शिंदेंच्या या बंडामुळे महाविकासआघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदे-फडणवीस यांनी 30 जूनला शपथ घेतल्यानंतर 39 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. 9 ऑगस्टला भाजपचे 9 तर शिवसेनेच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, यानंतर स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला खातेवाटपही करण्यात आं. मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर आता शिंदे सरकारचं पहिलं अधिवेशन सुरू होत आहे. 17 ऑगस्टपासून मुंबईत पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे, पण या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) उपस्थित नसतील. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा 17 ऑगस्टपासूनच सुरू होत आहे. रायगड जिल्ह्यातल्या दोन ठिकाणी आदित्य ठाकरेंच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. अलिबाग आणि महाडमध्ये 17 ऑगस्टला आदित्य ठाकरेंचा हा एक दिवसाचा दौरा असेल, त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ते हजर नसतील. पक्ष संघटनेकडे लक्ष शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसेना पक्ष संघटनेकडे लक्ष द्यायला सुरूवात केली आहे. शिवसंवाद यात्रेमधून आदित्य ठाकरे बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन मेळावे आणि सभा घेत आहेत. या प्रत्येक मेळाव्यात आणि सभेत आदित्य ठाकरे बंडखोरी केलेल्या आमदारांचा उल्लेख गद्दार असा करून त्यांच्यावर घणाघाती टीका करत आहेत. शिवसेना नक्की कुणाची? यावरून शिंदे आणि ठाकरे यांच्यात निवडणूक आयोगात लढाई सुरू आहे, त्यामुळे पक्ष वाचवण्याचं आव्हान उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे, तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही तोंडावर आहेत, त्यामुळे आदित्य ठाकरे विधिमंडळ कामकाजापेक्षा पक्ष बांधणीवर जास्त लक्ष केंद्रीत करत आहेत, असंच दिसत आहे.
First published:

Tags: Aaditya thackeray, Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackeray

पुढील बातम्या