मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

एकनाथ शिंदेंनी दिले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या तब्येतीचे लेटेस्ट अपडेट

एकनाथ शिंदेंनी दिले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या तब्येतीचे लेटेस्ट अपडेट

या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (CM Uddhav Thackeray) यांच्या प्रकृतीविषयीची अपडेट दिले आहेत.

या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या प्रकृतीविषयीची अपडेट दिले आहेत.

या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या प्रकृतीविषयीची अपडेट दिले आहेत.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 14 नोव्हेंबर: नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या प्रकृतीविषयीची अपडेट दिले आहेत. त्यासोबतच गडचिरोलीचे पालकमंत्री असल्यांनी त्यांनी काल झालेल्या चकमकीबद्दल माहिती दिली आहे. तसंच त्रिपुरातील घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले त्यावरही प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत चांगली आहे. मी कालच त्यांच्याशी फोनवरून बोललो असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील मानेची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. वरिष्ठ आँर्थो सर्जन डॉक्टरांच्या पथकाने तासभर ही शस्त्रक्रिया केली. सकाळी पाऊने नऊ वाजता ऑपरेशन यशस्वी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मान आणि पाठदुखीचा त्रास होऊ नये यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा पर्यायी सल्ला दिला होता. त्यानंतर आता शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.

हेही वाचा- अमरावतीतल्या सद्यस्थितीबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी दिली मोठी अपडेट

मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार एकनाथ शिंदेकडे?

मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल झाल्यावर एक पोस्ट व्हायरल झाली होती. मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत होतं. त्यामुळे अनेकांकडून सवाल उपस्थित केले जात होते. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी स्वत: याबद्दल खुलासा केला होता. (Eknath Shinde temporarily takes over as CM What is the truth behind the viral news)

काय म्हणाले एकनाथ शिंदे...

मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. त्यात कुठलेही तथ्य नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर उद्या एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यानंतर अवघे तीन ते चार दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होतील. आई जगदंबेचा कृपाशीर्वाद आणि तमाम जनतेच्या सदिच्छा उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहेत. त्यामुळे समाजमाध्यमावर फिरणाऱ्या खोट्या आणि खोडसाळ मेसेजस आणि पोस्टवर विश्वास ठेवू नये, ही नम्र विनंती.

गडचिरोली चकमकीवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

काल गडचिरोली जिल्हयात कोरची आलापल्ली जिल्ह्यात 26 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. ही एक मोठी कामगिरी आहे. गेल्यावर्षातील देशांतील ही सर्वात मोठी कारवाई, असल्याचं एकनाथ शिंदे म्हणालेत.

हेही वाचा- Shilpa Shetty आणि Raj Kundra ने मिळून केली फसवणूक,  गुन्हा दाखल

सर्व पातळ्याहून गडचिरोली पोलिसांचे कौतुक होत आहे. गडचिरोलीचे एसपी यांच्या मार्गदर्शनात कारवाई सुरू असून जखमीवर उपचार सुरू आहे. उपचारात काही कमी पडणार नसल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली आहे.

ही चकमक 9-10 तास सुरू होती. काल गस्त घालत असताना त्यांच्यावरव गोळीबार झाला. त्याला आपल्या पोलिसांनी उत्तर दिले. राज्यातील सर्वात मोठा कमांडर होता. त्याला तीन स्तरीय सुरक्षा असते. तरी त्याला कंठस्नान घातले. मिलिंद तेलतुमडेवर अनेक पुरस्कार होते. त्यामुळे त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. पोलीस अलर्टवर आहे. लोकांचे जीवन सर्वसामान्य करण्याचा प्रयत्न केला जाईल. नक्कीच पालकमंत्री म्हणुन मी त्यांना हे इनाम दिले जावे यासाठी पाठपुरावा करेन, असेही एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे.

हेही वाचा- AUS vs NZ LIVE Streaming : T20 वर्ल्ड कप फायनल कधी आणि कुठे पाहता येणार? 

त्याभागाचा विकास हे आमचे टार्गेट असेल.जे सरेंडर होतात त्यांना कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावे यासाठी सरकार पुर्णपणे प्रयत्न करत राहील, असंही ते म्हणालेत.

त्रिपुरा घटनेवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

त्रिपुराच्या घटनेचा परिणाम महाराष्ट्रात होणे योग्य नाही. पोलीस सर्व बाबींची माहिती घेत आहे. या प्रकरणासाठी कोण जबाबदार आहे ते तपासले जातील, असं त्यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Eknath Shinde, Uddhav Thackeray (Politician)