मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यात ठाकरेंना आणखी धक्के देणार? 24 तास आधी म्हणाले...

एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यात ठाकरेंना आणखी धक्के देणार? 24 तास आधी म्हणाले...

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने विचारांचे सोनं लुटण्यासाठी शिवसेनेकडून दरवर्षी दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं. पण सध्याची राजकीय पार्श्वभूमी काहीशी वेगळी आहे.

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने विचारांचे सोनं लुटण्यासाठी शिवसेनेकडून दरवर्षी दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं. पण सध्याची राजकीय पार्श्वभूमी काहीशी वेगळी आहे.

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने विचारांचे सोनं लुटण्यासाठी शिवसेनेकडून दरवर्षी दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं. पण सध्याची राजकीय पार्श्वभूमी काहीशी वेगळी आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 4 ऑक्टोबर : महाराष्ट्रासाठी उद्या खूप मोठा दिवस आहे. कारण उद्या विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण सर्वत्र साजरा होणार आहे. या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने विचारांचे सोनं लुटण्यासाठी शिवसेनेकडून दरवर्षी दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं. पण सध्याची राजकीय पार्श्वभूमी काहीशी वेगळी आहे. कारण शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आहे आणि शिवसेनेचे दोन गट निर्माण झाली आहे. एक शिवसेना ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील आहे. तर दुसरी सेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील आहे. उद्धव ठाकरे यांच्या सेनेला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर सभा घेण्यास परवानगी मिळाली आहे. खुद्द मुंबई हायकोर्टाने शिवसेनेला शिवाजी पार्क मैदानात सभा घेण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे शिंदे गटाचा मेळावा हा बीकेसी मैदानावर होणार आहे. या मेळाव्याच्या एक दिवस आधी शिंदेंनी मोठं विधान केलं आहे. "कोण कोणाबरोबर आहे हे उद्या कळेल", असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

उद्याचा होणारा दसरा मेळावा हा खूप मोठा आणि भव्य स्वरुपाचा होईल. उद्या कोण कोणाबरोबर असेल ते कळेल, असं एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही दसऱ्यासाठी जनतेला गोड बातमी दिली आहे. सरकारला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. तेवढ्यात साखर, चणाडाळ सारखे पदार्थ 100 रुपयात देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. शिंदे यांच्या या घोषणेमुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. याच घोषणेबद्दल ते उद्याचा भाषणात उल्लेख करण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे ठाकरेंना धक्का देणार?

शिंदे गटाची दसरा मेळाव्याआधी एक बैठक झाली होती. या बैठकीत मेळाव्याबाबत नियोजन करण्याविषयी चर्चा झाली होती. या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी मोठं विधान केलं होतं. 'दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या गाड्यांसाठी दहा मैदानं बूक केली आहेत. अनेक जण आपल्यासोबत येण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे अनेकांचे प्रवेश दसरा मेळाव्यात होतील,' असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्यामुळे एकनाथ शिंदे सेनेच्या आणखी कोणकोणत्या बड्या माशांना गळाला लावणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

(एकनाथ शिंदेंचा शिवसेनेनंतर राष्ट्रवादीला धक्का, ठाण्यातला 'मोठा मासा' गळाला!)

दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून गर्दी जमवण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. विशेष म्हणजे यासाठी शिंदे गटाने तब्बल 1700 एसटी बस बुक केल्या आहेत. त्यासाठी तब्बल 10 कोटी रुपये रोख भरले असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेला टक्कर देत शिंदे गट मुंबईतील बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेत आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. शिंदे गटाकडून राज्यभरातून समर्थकांना मुंबईत आणले जात आहे. दसरा मेळाव्यामुळे एसटी महामंडळाला सोन्याचे दिवस आले आहे. शिंदे गटाकडून तब्बल 1700 हून अधिक लालपरी बसेसचं बुकिंग करण्यात आले आहे. यासाठी शिंदे गटाने तब्बल १० कोटी रुपये रोख भरले आहे. ही रक्कम मोजण्यासाठी रविवार आणि सोमवार असे दोन दिवस लागले होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दसऱ्याला प्रथमच इतकी मोठी बुकिंग एसटी महामंडळात झाली आहे.

First published:

Tags: Eknath Shinde, Uddhav Thackeray