शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

युवासेनाप्रमुख आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.

  • Share this:

मुंबई, 31 ऑक्टोबर : भाजप आणि राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेनंही आपल्या विधीमंडळ पक्षनेत्याची निवड केली आहे. शिवसेनेकडून विधीमंडळ पक्षनेतेपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. युवासेनाप्रमुख आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला शिवसेनेच्या इतर आमदारांनी अनुमोदन देत एकनाथ शिंदे यांची एकमताने निवड केली.

सत्तास्थापनेआधी शिवसेनेच्या सर्व आमदारांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीतच विधीमंडळ नेतेपदाचा निर्णय घेण्यात आला. तसंच आमदार सुनील प्रभू यांची शिवसेना पक्षप्रतोद म्हणून निवड करण्यात आली आहे.

मुख्यमंत्रिपदाचं काय होणार?

सत्ता स्थापनेतील मतभेदानंतर शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष आता विकोपाला गेला आहे. 'महाराष्ट्रात एकट्या भाजपला जनादेश मिळाला नाही. जो जनादेश मिळाला आहे तो युतीला मिळाला आहे. सत्तेचं समसमान वाटप म्हणजे त्यामध्ये मुख्यमंत्रिपदही आलंच,' असं म्हणत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा समसमान वाटाघाटींचा सूर आवळला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेत पुन्हा एकदा पेच निर्माण झाला आहे.

'सुधीर मुनगंटीवार जर म्हणत असतील की विनाशकाले विपरीत बुद्धी, तर ते स्वत:च्या पक्षाबद्दल म्हणत आहेत. आम्ही कुठेही शब्द फिरवला नाही. फक्त सर्व ठरल्याप्रमाणे व्हावं, अशी आमची इच्छा आहे,' असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यामुळे शिवसेना मवाळ झाली आहे, असं वाटत असतानाच या नव्या भूमिकेमुळे युतीतील वाद पुन्हा एकदा चिघळणार असल्याचं दिसत आहे.

VIDEO : मीरा-भाईंदरमध्ये तरुणांची गुंडगिरी, तलवारीनं दोघांवर जीवघेणा हल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 02:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading