मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

माओवाद्यांच्या धमक्या झुगारून एकनाथ शिंदे गडचिरोलीत, जवानांसोबत दिवाळी साजरी!

माओवाद्यांच्या धमक्या झुगारून एकनाथ शिंदे गडचिरोलीत, जवानांसोबत दिवाळी साजरी!

दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला याच बरोबर त्यांच्या ताफ्याला जीवे मारण्याची माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.

दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला याच बरोबर त्यांच्या ताफ्याला जीवे मारण्याची माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.

दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला याच बरोबर त्यांच्या ताफ्याला जीवे मारण्याची माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.

  • Published by:  sachin Salve
भामरागड, 30 ऑक्टोबर : राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे व गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना जीवे मारण्याची धमकी माओवाद्यांनी (Maoist) दिली होती. पण माओवाद्यांच्या धमकीला भीक न घालता एकनाथ शिंदे यांनी शनिवारी जिल्ह्यातील भामरागड (bhamragad) तालुक्यातील दुर्गम भागातील दोदराज पोलीस स्टेशनला भेट देऊन जवानांसोबत दिवाळीचा (diwali) सण साजरा केला. माओवादी कारवायांमुळे अतिसंवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भगात सणवार सोडून आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस जवानांना यावेळी दिवाळीच्या खास शुभेच्छा देऊन फराळाचे वाटप केले. तसंच, सिरोंचा तालुक्यातील जिमाका येथील जंगलात ओरीसा आणि छत्तीसगड येथून आलेल्या जंगली हत्तींना संरक्षण मिळवून देण्यासाठी आढावा बैठक घेऊन चपराळा येथील अभयारण्याची पाहणी एकनाथ शिंदे यांनी केली. 1 नोव्हेंबरपासून या Smartphone मध्ये WhatsApp सपोर्ट करणार नाही, लगेच घ्या बॅकअप दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला याच बरोबर त्यांच्या ताफ्याला जीवे मारण्याची माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.  यासंबंधी ठाणे, मुंबई किंवा गडचिरोली गडचिरोली या ठिकाणी कुठेही गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर गृह खात्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या माहितीची शहानिशा केली जात असून एकनाथ शिंदे यांची सुरक्षा वाढवली जावी याबाबत विचार केला जात आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद एकनाथ शिंदे यांच्याकडे असून त्यांनी पालकमंत्रिपद सांभाळले पासून गडचिरोलीमध्ये अनेक विकास कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. यात विशेष करून कोरोनाच्या काळात आरोग्य सेवा घरोघरी पोहोचवण्याचे काम यावर त्यांनी भर दिला होता. जमिनीसाठी पत्नीने केली पतीची हत्या, मुलगा आणि दीरानेही दिली साथ रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केली, कोरोना सेंटर कॅम्प लावले,  कोरोना चाचणी कॅम्प लावले लसीकरण कॅम्प लावले याच बरोबर दळणवळणाच्या कामांना गती दिली अशी अनेक कामे गेल्या दोन वर्षात एकनाथ शिंदे यांनी केली आहेत. यामुळे कोरोनाच्या काळात गडचिरोलीतील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळाली याच बरोबरीने इतर विकास कामे देखील एकनाथ शिंदे यांनी केली असून खोळंबलेल्या विकासकामांना देखील एकनाथ शिंदे यांनी गती मिळवून दिली. यामुळे गडचिरोलीतील नागरीक राज्य सरकारशी कनेक्ट होऊ लागले होते. याचा राग मनात धरून माओवाद्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली असावी असा संशय व्यक्त केला जातोय.
First published:

पुढील बातम्या