मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राजनी ऐकलं, पण शिंदेंना कायद्याचा फायदा! बाळासाहेबांच्या फोटोवरून शिंदे गटाचं उद्धवना प्रत्युत्तर

राजनी ऐकलं, पण शिंदेंना कायद्याचा फायदा! बाळासाहेबांच्या फोटोवरून शिंदे गटाचं उद्धवना प्रत्युत्तर

बुधवारी झालेल्या शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली. शिंदे गट म्हणजे बाप चोरणारी टोळी असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

    रायगड, 22 सप्टेंबर : बुधवारी झालेल्या शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली. शिंदे गट म्हणजे बाप चोरणारी टोळी असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. तसंच निवडून यायचं असेल तर स्वत:च्या हिंमतीवर निवडून या, बाळासाहेबांचा फोटो कशाला वापरता? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सगळ्या शिवसैनिकांना पित्यासमान आहेत. सरकारने त्यांना कायदेशीररित्या राष्ट्रीय पुरूष म्हणूनही संबोधले आहे, तसा जीआरही काढण्यात आला आहे,' असं दादा भुसे म्हणाले. 'देशाचे पिता, दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत, फोटोच काढण्याचा विषय असेल तर उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढून जनतेच्या दरबारामध्ये जाऊन दाखवावं,' असं आव्हानही दादा भुसे यांनी दिलं. दादा भुसे हे रायगडमध्ये जिल्हा कार्यकारिणी आढावा बैठकीसाठी आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मनसेच्या सभांमध्ये बाळासाहेबांचे फोटो राज ठाकरे यांनी जेव्हा मनसेची स्थापना केली तेव्हा सुरूवातीला त्यांचे मेळावे, जाहीर सभा आणि पोस्टरवर बाळासाहेब ठाकरेंचे फोटो असायचे, पण त्यावेळी बाळासाहेबांनी आपले फोटो लावू नका, असं राज ठाकरेंना स्पष्ट सांगितलं होतं, यानंतर राज ठाकरेंनीही त्यांच्या सभांमध्ये बाळासाहेबांचे फोटो लावले नाहीत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cm eknath shinde, Raj Thackeray, Uddhav thackeray

    पुढील बातम्या