मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मंत्रिमंडळ विस्तार झाला, केबिन नंबर 602 घ्यायची 'हिंमत' कोण दाखवणार? असा आहे इतिहास

मंत्रिमंडळ विस्तार झाला, केबिन नंबर 602 घ्यायची 'हिंमत' कोण दाखवणार? असा आहे इतिहास

एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता मंत्रालयातील 602 नंबरचं केबिन कोण घेणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. राज्यात महाविकासआघाडी सरकार आलं तेव्हा हे केबिन घेण्यासाठी कुणीही धजावत नव्हतं, कारण या केबिनचा इतिहास तसाच आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 11 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतल्यानंतर 39 दिवसांनी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. भाजपच्या 9 तर शिंदे गटाच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, पण अजूनही या मंत्र्यांचं खातेवाटप झालेलं नाही. मंत्र्यांना सुरूवातीला कार्यालय द्यायला हवं, याचं काम सुरू असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली. दीपक केसरकर यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर मंत्रालयातलं केबिन नंबर 602 घ्यायची हिंमत कोण दाखवणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागचा इतिहास बघता महाविकासआघाडी सरकारमध्ये अजित पवारांनी (Ajit Pawar) ही केबिन नाकारल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. अजित पवारांनी मात्र हे वृत्त फेटाळलं होतं. महाविकासआघाडी सरकारमध्ये हे केबिन कुणालाच देण्यात आलं नाही. मंत्रालयातलं 602 नंबरचं हे केबिन घ्यायला अनेक मंत्री धजावत नाहीत, कारण हे केबिन अनलकी असल्याची अंधश्रद्धा त्यांच्या मनात बसली आहे. 602 नंबरचं हे केबिन जवळपास 3 हजार चौरस फुटांचं आहे. या केबिनमध्ये एक कॉन्फरन्स रूम, कर्मचाऱ्यांसाठी हॉल आणि दोन मोठ्या केबिन आहेत. 602 नंबर केबिनचा इतिहास 2014 साली एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना हे केबिन देण्यात आलं होतं. याच कार्यालयातून खडसे यांनी महसूल, कृषी आणि अल्पसंख्याक विभागाचं काम केलं. पण दोन वर्षांनी एकनाथ खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. खडसेंच्या राजीनाम्यानंतर पांडुरंग फुंडकर (Pandurang Phundkar) यांना कृषी खात्याचा कारभार आणि हे केबिन देण्यात आलं, पण 2018 मध्ये फुंडकर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. फुंडकरांच्या मृत्यूनंतर 2019 मध्ये अनिल बोंडे (Anil Bonde) यांना कृषीमंत्री बनवण्यात आलं आणि त्यांनाही केबिन नंबर 602 देण्यात आलं. 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये अनिल बोंडे यांना पराभवाचा धक्का बसला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Devendra Fadnavis, Eknath Shinde

    पुढील बातम्या