मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'शिवसैनिकांना नोकर समजलं तर खपवून घेणार नाही', एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर दिल्लीतून 'बाण'

'शिवसैनिकांना नोकर समजलं तर खपवून घेणार नाही', एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर दिल्लीतून 'बाण'

शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोकर समजलं किंवा तशी वागणूक दिली तर ती खपवून घेतली जाणार नाही, असं रोखठोक मत एकनाथ शिंदेंनी मांडलं.

शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोकर समजलं किंवा तशी वागणूक दिली तर ती खपवून घेतली जाणार नाही, असं रोखठोक मत एकनाथ शिंदेंनी मांडलं.

शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोकर समजलं किंवा तशी वागणूक दिली तर ती खपवून घेतली जाणार नाही, असं रोखठोक मत एकनाथ शिंदेंनी मांडलं.

  • Published by:  Chetan Patil
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला असताना दिल्लीतही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. मुंबईत उद्धव ठाकरेंनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर शाब्दिक तोफ डागली. तर एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून मुख्यमंत्र्यांवर टीकेचा बाण सोडला. शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोकर समजलं किंवा तशी वागणूक दिली तर ती खपवून घेतली जाणार नाही, असं रोखठोक मत एकनाथ शिंदेंनी मांडलं. काहींनी विचारलं की, मालकासोबत जाणार की नोकरासोबत? हा पक्ष काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना पुढे घेवून जाण्याचं काम करतोय. तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नोकर समजणार तर ते सहन केलं जाणार नाही. बाळासाहेब ठाकरेंसोबत हजारो कार्यकर्ते आणि शेकडो पदाधिकाऱ्यांनी रक्त आणि घाम गाळून शिवसेना उभा केली. त्यांनी पक्षासाठी दिवसरात्र मेहनत करत बलिदान दिलं आहे. त्यामुळे तुम्हाला शिवसेना आमची जहागीर आहे, असं सांगण्याचा अधिकार नाही. बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत. त्यामुळे आम्हाला चांगला पाठिंबा मिळत आहे. ('महाराष्ट्रात बाप पळवणारी टोळी, मुंबईचे लचके तोडू देणार नाही', उद्धव ठाकरेंच्या आक्रमक भाषणातील महत्त्वाचे मुद्दे) "अडीच वर्षांनी गटप्रमुखांची आठवण आली, वर्षा-मातोश्रीवर प्रवेश नव्हता. आम्ही क्रांती केली म्हणून गटप्रमुखांना चांगले दिवस आले आहेत", असं एकनाथ शिंदे म्हणाले. "खोके वगैरे बोलता, वेळ आली की बोलीन, माझ्यापेक्षा जास्त हिशोब कुणाकडे असेल? हे सगळं महाराष्ट्रात बोलेन", असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. "आम्हाला मिंधे गट म्हणाले, आम्ही मिंधे नाही बाळासाहेबांचे खंदे लढवय्ये आहोत. सरकार बनवण्यासाठी मिंधेपणा कोणी केला? सरकार बनवण्यासाठी काँग्रस-राष्ट्रवादीसोबत कोण गेलं? हे महाराष्ट्र-देश बघतोय. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना आसमान दाखवयाची वेळ येणार नाही, तीन महिन्यांपूर्वी आसमान दाखवलं आहे", असं एकनाथ शिंदे म्हणाले. "बाप चोरणारी टोळी म्हणाले, आम्हाला अभिमान आहे. बाळासाहेब आमचे कुटुंबप्रमुख, त्यांचे विचार पुढे घेऊन चाललो आहोत. आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता, आपण बापाचा पक्ष आणि विचार विकणारी टोळी आहे, असं आम्ही म्हणायचं का?", असा सवाल शिंदेंनी केला.
First published:

Tags: Eknath Shinde

पुढील बातम्या