मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'हम तो डुबेंगे सनम लेकिन...' एकनाथ खडसेंचा महाजनांना थेट इशारा

'हम तो डुबेंगे सनम लेकिन...' एकनाथ खडसेंचा महाजनांना थेट इशारा

माझ्यामागे ईडी लागली, सीबीआय लागली, अँटी करप्शन लागलं असेल नसेल ते लागलं, पण काय झालं काहीच नाही.

माझ्यामागे ईडी लागली, सीबीआय लागली, अँटी करप्शन लागलं असेल नसेल ते लागलं, पण काय झालं काहीच नाही.

माझ्यामागे ईडी लागली, सीबीआय लागली, अँटी करप्शन लागलं असेल नसेल ते लागलं, पण काय झालं काहीच नाही.

  • Published by:  sachin Salve
इम्तियाज अली, प्रतिनिधी मुक्ताईनगर, 08 ऑगस्ट : 'कोणी म्हणते नाथाभाऊ तुरुंगात जाईल जायचंय तुरुंगात जाईल. मात्र माझं एक वाक्य लक्षात ठेवा 'हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे' असं म्हणत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी भाजपचे नेते गिरीश महाजन (girish mahajan) यांचं नाव न घेता कडक इशारा दिला. महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर जळगावामध्ये भाजपचे नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. संजय राऊत यांच्यानंतर पुढचा नंबर हा एकनाथ खडसे यांचा असणार आहे, असा दावाच महाजनांनी केला होता. आज त्यांच्या या दाव्याला खडसेंनी आपल्या शैलीत उत्तर दिले. ईडी नावाचा प्रकार आता घरोघरी पोहोचला आहे. माझ्यामागे ईडी लागली, सीबीआय लागली, अँटी करप्शन लागलं असेल नसेल ते लागलं काय झालं काहीच नाही. विरोधकांना उठलं की फक्त नाथाभाऊच दिसतो. कोणी म्हणते नाथाभाऊ तुरुंगात जाईल, जायचंय  तर तुरुंगात जाईल. मात्र माझं एक वाक्य लक्षात ठेवा 'हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे' असं म्हणत खडसेंनी महाजनांवर जोरदार पलटवार केला.

(प्रियकराच्या मदतीने पत्नीकडून प्राध्यापक पतीची हत्या)

गावा गावातल्या मुलांना ही माहिती नव्हतं की राज्यपाल कोण आहे. पण राज्यपाल हे कायम वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहिले आहे. त्यांची कारकिर्द ही अत्यंत वादग्रस्त ठरली आहे, अशी टीकाही खडसेंनी केली. (सोमवारच्या उपवासासाठी बनवा मखाना बर्फी, गोड खाऊनही वाढणार नाही वजन) शिंदे आणि भाजप यांच्या भानगडी होणारच आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितलं माझे 50 आमदार मी निवडून आणल्याशिवाय राहणार नाही शिंदेंनी मुक्ताईनगर पाचोरा जळगाव जिल्ह्यातील आमदार निवडून आणलेच पाहिजे. मग काय भाजपचे बाशिंग बांधून बसलेल्या आमदारांचा गरज काय? भाजपचा पत्ता कट यांच्यात पुढे चांगल्याच भानगडी होतील. शिंदे गटाच्या 50 आमदारांचे तिकीट वाटप करून मोकळे झाले त्यामुळे भाजपाच्या 50 आमदारांचा तिकीट आता कापले जाणार हे खरं आहे, असा दावाच खडसेंनी केला.
First published:

पुढील बातम्या