मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'तो अध्यादेश म्हणजे OBC समाजाची फसवणूक', एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर मोठा आरोप

'तो अध्यादेश म्हणजे OBC समाजाची फसवणूक', एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर मोठा आरोप

'फडणवीस यांनी राजकारणातून संन्यास घेऊ नये, ते विरोधी पक्षनेते म्हणून उत्तम काम करत आहेत'

'फडणवीस यांनी राजकारणातून संन्यास घेऊ नये, ते विरोधी पक्षनेते म्हणून उत्तम काम करत आहेत'

'फडणवीस यांनी राजकारणातून संन्यास घेऊ नये, ते विरोधी पक्षनेते म्हणून उत्तम काम करत आहेत'

जळगाव, 28 जून : ओबीसी आरक्षणाच्या (obc reservation) मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांची दुटप्पी भूमिका आहे. गेल्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी आरक्षणाचा अध्यादेश काढला होता पण ती फसवणूक होती' अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी फडणवीस यांच्यावर केली. तसंच, फडणवीसांनी संन्यास घेऊ नये, त्यांनी 5 वर्ष विरोधक म्हणून सरकारला सल्ला द्यावा, असा सणसणीत टोलाही नाथाभाऊंनी लगावला.

जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत असताना एकनाथ खडसे यांनी स्थानिक स्वराज संस्थेतील राजकीय आरक्षण रद्द मुद्यावर आपली रोखठोक भूमिका मांडत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

घटस्फोट न देता ‘लिव्ह-इन’मध्ये राहणाऱ्या महिलेची संरक्षणाची मागणी फेटाळली

'जोपर्यंत जनगणनेचा डाटा उपलब्ध होत नाही तोपर्यंत अध्यादेशाला महत्त्व नाही, हे फडणवीस यांना माहिती होते. अजूनही वेळ गेलेली नाही. केंद्र सरकारकडून डाटा आणला तर राज्य सरकार त्यावर काम करू शकेल. पण केंद्राकडून डाटा मिळू द्यायचा नाही आणि ओबीसींचे आम्हीच पाठीराखे असे म्हणायचे ही दुटप्पी भूमिका फडणवीस यांची आहे' अशी टीकाही खडसे यांनी केली.

मुंबईत 50% लहान मुलांना कोरोना झाला; BMC च्या रिपोर्टमध्ये धक्कादायक बाब समोर

'फडणवीस यांनी राजकारणातून संन्यास घेऊ नये, ते विरोधी पक्षनेते म्हणून उत्तम काम करत आहेत, त्यांनी 5 वर्षे सरकारला सूचना कराव्यात. मुळात फडणवीस वारंवार अशा घोषणा करतात. वेगळा विदर्भाच्या मुद्द्यावर त्यांनी आपण लग्न करणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा केली होती. पण त्यांनी लग्न केले. असा प्रकार आपण पुराणात पाहिला आहे. विश्वामित्राने ब्रम्हचार्य भंग करून मेणकेशी लग्न केले होते. तसा हा प्रकार आहे' असा टोलाही खडसेंनी लगावला.

तसंच, 'देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीशी युती करणार नाही, असं सांगितलं होतं. पण पहाटे अजित पवार यांच्यासोबत शपथ घेतली होती. आता तर केंद्रात सत्ता दिली आहे तर ओबीसींना आरक्षण मिळवून देऊ म्हणतात. सत्ता नसेल तर मदत करणार नाही, असे वाटते' असा टोलाही खडसेंनी फडणवीसांवर लगावला.

First published:

Tags: Eknath khadse