BRAKING : अखेर नाथाभाऊंचं ठरलं, आजच ठोकणार भाजपला 'रामराम'

BRAKING : अखेर नाथाभाऊंचं ठरलं, आजच ठोकणार भाजपला 'रामराम'

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार हे आता निश्चित झाले आहे.

  • Share this:

मुंबई, 21 ऑक्टोबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार हे आता निश्चित झाले आहे.  आपण आजच भाजपला रामराम ठोकणार आहोत, अशी माहिती खुद्द एकनाथ खडसे यांनी न्यूज 18 लोकमताला दिली आहे.

न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना  एकनाथ खडसे यांनी सर्व चर्चांना विराम देत आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. आज संध्याकाळपर्यंत भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा देणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

एकनाथ खडसे हे  कन्या रोहिणी खडसे यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. उद्या  22 ऑक्टोबरला प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा सोहळा होईल. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यादेखील राष्ट्रवादीत दाखल होतील. त्यामुळे खडसे समर्थकांना सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी कार्यालयात येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादीत प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांच्यावर पक्ष संघटनेची मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे.  एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत कोण-कोण राष्ट्रवादीमध्ये येणार याची उत्सुकता आहे.  खडसे यांच्या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रामधील अनेक नेते राष्ट्रवादीमध्ये दाखल होण्याची चिन्ह आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Published by: sachin Salve
First published: October 21, 2020, 12:44 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading