खडसेंचं ठरलं की काय, मुक्ताईनगर भाजप कार्यालयावरील मोदींसोबत असलेलं फलक गायब

खडसेंचं ठरलं की काय, मुक्ताईनगर भाजप कार्यालयावरील मोदींसोबत असलेलं फलक गायब

मुक्ताईनगर जेडीसीसी बँकेच्या जवळ असलेले भारतीय जनता पार्टी पक्षाचे कार्यालय नेहमी उघडे असते. नेहमीप्रमाणे भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बुधवारी कार्यालयात आले.

  • Share this:

जळगाव, 19 डिसेंबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात गुप्त बैठक झाली. त्यामुळे भाजपला रामराम ठोकत खडसे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. इतकंच नव्हे तर मुक्ताईनगरच्या भाजप कार्यालयावर लावण्यात आलेले ‘भाजपा कार्यालय’ हा फलक गायब झाला आहे. यामुळे खडसे लवकरच पक्ष बदलणार असल्याचं ठरलं की काय असं बोललं जात आहे.

मुक्ताईनगर जेडीसीसी बँकेच्या जवळ असलेले भारतीय जनता पार्टी पक्षाचे कार्यालय नेहमी उघडे असते. नेहमीप्रमाणे भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बुधवारी कार्यालयात आले. यावेळी भाजपा कार्यालय मुक्ताईनगर असे भलेमोठे फलकच आढळून आले नाही. फलक कुठे गेला किंवा कोणी काढला का? यासंदर्भात भाजपाच्या सामन्य कार्यकर्त्यांना कल्पना नव्हती. या कार्यालयात  पंचायत समितीचे माजी सभापती राजू माळी, विठ्ठल जोगी, राजू कपले, खडकाचे मुंढोळदा उपसरपंच रावजी धनगर तसेच जानकीराम पांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप कार्यालयावरील फलक नसल्याबद्दल तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर यांच्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘मी गेल्या चार दिवसांपासून बाहेरगावी आहे. भाजप कार्यालयावर फलक होता. आता यासंदर्भात मला काहीच कल्पना नाही' त्यामुळे यावर आता खडसे काही बोलणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

इतर बातम्या - 'मुख्यमंत्र्यांना शेजारी बसलेल्या दोघांची काळजी', फडणवीसांची आक्रमक टीका

राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? नागपुरात दाखल झालेल्या एकनाथ खडसेंनी दिलं होतं उत्तर

दरम्यान,  मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना किंवा इतर कोणालाही भेटू शकतो. पण त्याचा काही वेगळा अर्थ काढू नये, असंही एकनाथ खडसे म्हणाले होते. 'माझं मन वळवण्याचा प्रश्नच येत नाही कारण मी कुठला निर्णयच घेतलेला नाही. निर्णय घेतला असता तर मन वळवण्याचा प्रश्न आला असता. माझा आमच्या पक्षातील वरिष्ठांशी कायम संपर्क असतो,' असं म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजपमधील दिल्लीतील नेते त्यांची समजूत काढत आहेत, याबाबतच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अजूनही पक्षावर नाराज आहे. वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत देणारे खडसे आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. त्यामुळे खडसे मोठा निर्णय घेण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

इतर बातम्या - मुंबईत उद्योगपतीने मित्रांसोबत केली पत्नीची देवाणघेवाण, 3 वेळा केला बलात्कार

विधानसभा निवडणुकीत आधी तिकीट न दिल्यामुळे खडसे नाराज होते. त्यानंतर मुलगी रोहिणी खडसे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. रोहिणी यांचा अवघ्या 3 हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळे खडसे यांनी पक्षातील काही जणांनी यासाठी कामं केलं असा गंभीर आरोप केला होता. याबद्दल तसे पुरावे त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिले होते. तसंच त्यांनी नावं जाहीर करण्यासाठी परवानगीही मागितली होती. परंतु, पाटील यांनी आश्वासन देऊन त्यांची मनधरणी केली होती.

BREAKING: मुंबईत पहाटेच्या सुमारास शिवसेना नेत्यावर अज्ञातांकडून गोळीबार

Published by: Renuka Dhaybar
First published: December 19, 2019, 1:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading