एकनाथ खडसेंना निर्णय घ्यावा लागेल, शरद पवारांचे सूचक विधान

एकनाथ खडसेंना निर्णय घ्यावा लागेल, शरद पवारांचे सूचक विधान

'गेली 25 वर्ष पाहिली तर सर्वात प्रभावी विरोधीपक्ष नेते म्हणून खडसेंची ओळख आहे. पण, दुर्दैवाने त्याची दखल घेतली गेली नाही'

  • Share this:

उस्मानाबाद, 19 ऑक्टोबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. पण, आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीप्रवेशाबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. 'त्यांना जर राजकीय निर्णय घ्यायचा असेल तर, तो त्यांना पाहावा लागणार आहे' असं पवार म्हणाले.

उस्मानाबादमधील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केल्यानंतर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी त्यांनी खडसेंच्या राष्ट्रवादीत प्रवेशावर भूमिका स्पष्ट केली.

'एकनाथ खडसे विरोधीपक्ष नेते होते. राज्याचे अर्थमंत्री होते. एक नेता म्हणून खडसे यांचे मोठे योगदान आहे. ते आम्ही पाहिले आहे. आणि त्यामुळे त्याचं कर्तृत्व, जबाबदारी आम्ही पाहिले आहे. त्यामुळे राजकीय निर्णय काय घ्यायचा आहे, तो त्यांना पाहावा लागणार आहे, असं पवार म्हणाले.

तसंच, 'गेली 25 वर्ष पाहिली तर सर्वात प्रभावी विरोधीपक्ष नेते म्हणून खडसेंची ओळख आहे. पण, दुर्दैवाने त्याची दखल घेतली गेली नाही. त्यांना त्याबद्दल दु: ख वाटत असेल. त्यामुळे आपल्या कामाची जिथे नोंद घेतली तिथे जावे वाटते का, असा विचार करत असतील. पण, त्यांना आमच्या पक्षाबद्दल विश्वास वाटत असेल तर काही करता येणार नाही' असं सूचक विधानही पवारांनी केले.

दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी जी भाषा वापरली, त्याबद्दल अमित शहा यांनी नाराजी व्यक्त केली. मी आजपर्यंत अनेक राज्यपाल पाहिले, त्यांच्याशी संबंधही आला. पण, असे भाष्य करण्याचे धाडस कुणी केले नाही. या पदाची प्रतिष्ठा राखता आली पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची ही प्रतिष्ठा राखायला हवी, राज्यपालपदावर त्यांना राहायचे की नाही, हा त्यांचा निर्णय आहे, असं ही पवार म्हणाले.

'राज्य सरकारला जी काही मदत करायची आहे, ती मदत करत असतो. आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राला कर्ज काढावे लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भागाची पाहणी करून कर्ज घेऊन लोकांना या संकटातून बाहेर काढावे. केंद्र सरकारनेही राज्याला मदत करण्याची गरज आहे' असंही पवार म्हणाले.

काल मी पाहणी केली त्यानंतर केंद्राने मदत करावी असं म्हटलं होतं. पण, लगेच पाहणी करून कोणताही निष्कर्ष काढता येत नाही. पाहणी करावे लागते, पंचनामे करावे लागता सर्व माहिती रेकॉर्ड ठेवावी लागते. त्यानंतर मदतनिधीची घोषणा होत असते. किल्लारीमध्ये जेव्हा भूकंप आला होता. त्यावेळी सर्व स्तारातील लोकांनी मदत केली होती. भूकंप झाल्या झाल्या लगेच घरांची बांधणी करण्यात आली नव्हती, त्यामुळे सर्वांनी मदत करण्याची वेळ आहे, असंही पवार यांनी स्पष्ट केले.

Published by: sachin Salve
First published: October 19, 2020, 9:46 AM IST

ताज्या बातम्या